भाजपचं उन्नाव रेप कांडातील आरोपीला तिकिट, पीडितेचं पंतप्रधानांना पत्र
X
भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमधील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान उन्नाव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अरुणसिंग यांना उमेदवारी दिली आहे. अरुणसिंग हे उन्नावच्या माखी बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीपसिंग सेंगर यांच्या जवळील व्यक्ती तर आहेच त्याचबरोबर राज्यमंत्री रणवेंद्र प्रताप सिंह उर्फ धुन्नी सिंग यांचे जावई आहेत.
दरम्यान उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीने अरुण सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एवढंच नव्हे तर जेव्हा बलात्कार पीडित मुलीच्या कुटुंबातील सदस्यांचा अपघात झाला होता, तेव्हा सुद्धा अरुण सिंग यांना आरोपी करार देण्यात आला होता.
मात्र, या प्रकरणी पीडित मुलीने पंतप्रधान मोदींना पत्र लिहीलं आहे. ज्यात तिने म्हंटलंय की, भाजप त्या लोकांना तिकीट देत आहे, जे मला जीवानिशी मारण्याचा विचार करत आहेत.
पीडित मुलगी म्हणते की, कुलदीप सिंग सेंगर आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी माझ्या कुटुंबाचा मारलं आहे. एकीकडे भाजप सांगतंय की दोषींना तुरूंगात टाकलं जात आहे, तर दुसरीकडे ते त्यांच्या पक्षाकडून आरोपींना तिकिट देत आहेत. मला न्याय कसा मिळेल?
पीडित मुलीने अरुण सिंग यांच्याकडून तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांचं तिकीट रद्द करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी कित्येक दिवस प्रयत्न केल्यांनतर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास भाजपने नवाबगंजचे माजी ब्लॉक प्रमुख तसेच औरास द्वितीय मधून निवडलेले अरुण सिंग यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष राजकिशोर रावत यांनी निवडणुकीत भाजपचं जिंकेल असा दावा सुद्धा केला आहे.
लक्षणीय बाब म्हणजे यापूर्वी भाजपने जिल्हा परिषद सदस्य पदासाठी कुलदीपसिंग सेंगर यांची पत्नी संगीता सेंगर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, जेव्हा गोंधळ उडाला. तेव्हा त्यांचं तिकिट रद्द करण्यात आलं, मात्र, यापूर्वी कुलदीपसिंग सेंगर यांच्या पत्नी संगीता सेंगर या उन्नाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा होत्या.