Top
Home > Max Political > महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त, राज्य सरकार वसुलीत व्यस्त – केंद्रीय आरोग्य मंत्री

महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त, राज्य सरकार वसुलीत व्यस्त – केंद्रीय आरोग्य मंत्री

महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त, राज्य सरकार वसुलीत व्यस्त – केंद्रीय आरोग्य मंत्री
X

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त झालेला असताना महाराष्ट्र सरकार फक्त वसुलीमध्ये व्यस्त आहे, अशा शब्दात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यास देशभरातील राज्य सरकारं जबाबदार असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने तर कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली असा आरोपही त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने सातत्याने महाराष्ट्र सरकारला सल्ले दिले पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. एवढेच नाही तर कोरोनावरील लसीचा तुटवडा असल्याचा आरोपही निराधार असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. तसेच राज्यातील काही नेते लसीचा तुटवडा असल्याचे सांगून राज्य सरकारचे कोरोना संसर्ग रोखण्यातील अपयश लपवत असल्याचाही आरोप हर्षवर्धन यांनी केला आहे.
"महाराष्ट्रामुळे देशाच्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला फटका"
महाराष्ट्र सरकारच्या निष्काळजीपणामुळे देशाच्या कोरोनाविरोधातल्या लढ्याला मोठा फटका बसल्याचा आरोप् हर्षवर्धन यांनी केला आहे.

आज महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि मृत्यूंची संख्यादेखील सर्वाधिक आहे, एवढेच नाहीतर कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जगात सर्वात जास्त महाराष्ट्रात आहे, असेही हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. कोरोना चाचण्या योग्य पद्धतीने होत नाहीयेत तसेच संपर्कातील लोकांचा शोधही व्यवस्थित घेतला जात ऩसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. एकूणच महाराष्ट्रात राज्य सरकार कोरोना परिस्थितीत हाताळण्यात नापास झाल्याचा दावा हर्षवर्धन यांनी केला आहे. 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची अतार्कीक मागणी करुन विषय भरकटवला जात असल्याचे म्हणत त्यांनी राज्याची मागणी फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग- हर्षवर्धन

महाराष्ट्राला एवढ्या मोठ्या घालून महाराष्ट्र सरकार खासगी वसुलीत दंग आहे, असा आरोपीह हर्षवर्धन यांनी केला आहे.

भाजपशासित राज्यांचा विषय एका ओळीत संपवला

एकीकड़े महाराष्ट्रातील सरकारवर टीका करताना हर्षवर्धन यांनी भाजपशासित राज्यांमधील परिस्थितीचा ओझरता उल्लेख करत त्यांचा विषय एका वाक्यात संपवला आहे. कर्नाटक, गुजरात, राजस्थान या राज्यांनीही आपल्या आरोग्य व्यवस्था दर्जेदार कऱण्याचा सल्लाही दिला आहे.

Updated : 2021-04-07T21:35:32+05:30
Next Story
Share it
Top