Home > Max Political > #Budget2022 : 'घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प' - बाळासाहेब थोरात

#Budget2022 : 'घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प' - बाळासाहेब थोरात

#Budget2022 : घोर निराशा करणारा दिशाहीन व अर्थहीन संकल्प - बाळासाहेब थोरात
X

"मोदी सरकारने आपल्या नेहमीच्या पद्धतीने या बजेटमधून मोठमोठे आकडे फेकून भव्य दिव्य स्वप्न दाखवली आहेत. गुलाबी स्वप्नांशिवाय सर्वसामान्यांना काहीही मिळाले नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन, या अर्थसंकल्पाची मांडणी केली गेली आहे." अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पुन्हा एकदा डिजीटल स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केला आहे, त्यामुळे सर्व वर्गाची घोर निराशा झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सरकारी कंपन्या विकणे, टॅक्स आणि इंधनाचे दर वाढविणे यापलीकडे केंद्र सरकारकडे दुसरे काही धोरण नाही. सरकारी पैशांतून व्यवस्था उभ्या करायच्या आणि पुन्हा त्या विकायच्या हेच, मागील सात वर्षात सुरु आहे, अशीही टीका त्यांनी केली. एवढेच नाही तर मोदी सरकारने गेल्या सात वर्षांत सादर केलेले अर्थसंकल्प बघितले तर, ते कायमच अर्थसंकल्पातून भविष्याची स्वप्न दाखवत आले आहेत. मात्र गेल्या सात वर्षात काय केले हे सांगत नाहीत, १०० स्मार्ट सिटी, सांसद आदर्श ग्राम योजनेची काय स्थिती आहे? यावर सरकार गप्प का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Updated : 1 Feb 2022 11:00 AM GMT
Next Story
Share it
Top