Home > Max Political > भाजप प्रवेशामुळे माजी खासदार उल्हास पाटील यांची काँग्रेस मधून हकालपट्टी:

भाजप प्रवेशामुळे माजी खासदार उल्हास पाटील यांची काँग्रेस मधून हकालपट्टी:

भाजप प्रवेशामुळे माजी खासदार उल्हास पाटील यांची काँग्रेस मधून हकालपट्टी:यामुळेच काँग्रेस रसातळाला: काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांची काँग्रेस वर टीका..

भाजप प्रवेशामुळे माजी खासदार उल्हास पाटील यांची काँग्रेस मधून हकालपट्टी:
X

जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार डॉ उल्हास पाटील भाजप च्या गळाला लागले आहेत.डॉ पाटील यांची कन्या डॉ केतकी पाटील ह्या रावेर लोकसभेसाठी भाजप कडून तयारी करत आहेत. यामुळे डॉ पाटील पिता पुत्री भाजप मध्ये प्रवेश करणार निश्चित आहे.





एकनाथ खडसे यांच्या सून आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याच्या चर्चा आहेत. रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाली नाही तर काँग्रेसच्या डॉ केतकी पाटील ह्या इच्छुक आहेत. मात्र त्यासाठी अगोदर भाजप प्रवेश करावा लागनार असल्याने डॉ पाटील तसंच त्यांची कन्या येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. त्या अगोदरच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाने डॉ उल्हास पाटील यांना तसंच काँग्रेस युवक अध्यक्ष देवेंद्र मराठे यांना सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.भाजप मध्ये प्रवेश करण्या अगोदरच कारवाही करून काँगेसनेही पक्ष सोडणाऱ्यांविरोधात एक कडक संदेशचं दिला आहे.



काँग्रेस मध्ये एकाधिकार शाही : डॉ उल्हास पाटील

मला कुठलीही नोटीस नाही, माझं म्हणणं एकूण न घेता मला नैसर्गिक न्याय न देता थेट पक्षातून निलंबन करणं म्हणजे ही तर एकाधिकारशाही असून ही लोकशाही नाही, यामुळेच काँग्रेस रसातळाला जातं आहे असा थेट आरोप डॉ. उल्हास पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वावर केला आहे.आता पर्यंतच्या काँग्रेस पक्षाच्या आंदोलनात माझा सहभाग होता व पक्षाचे प्रत्येक आदेश पाळले जिल्ह्यातील काँग्रेस पार्टीचा कोणताही खर्च गाड्यांच्या खर्चापासून तर पाण्याच्या बाटली पर्यंत सर्व खर्च मीच करायचो याची आठवनही डॉ पाटील यांनी काँग्रेसला करून दिली.




दरम्यान डॉ. केतकी पाटील यांच्या बरोबर डॉ उल्हास पाटीलही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप प्रवेश करणार आहेत.मात्र रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी कापून डॉ केतकी पाटील यांना उमेदवारी देण्याबाबत कोणताही ठोस आश्वासन दिलेले नाही असं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघकडून बोललं जातं आहे. रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे पुन्हा तयारीत आहेत. तसंच मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचीही चर्चा आहे. भाजप चे माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचा मुलगा अमोल जावळे यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे.भाजप एनवेळी कोणाला उमेदवारी देते हे अनिश्चित आहे.




Updated : 22 Jan 2024 5:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top