Home > Max Political > तासाला २ दोन बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत ; तरीही मोदींचा ग्राफ वरतीच ; पवन खेरांनी सुनावले

तासाला २ दोन बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत ; तरीही मोदींचा ग्राफ वरतीच ; पवन खेरांनी सुनावले

काँग्रेसने पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला, दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस चे प्रवक्ते पवनखेडा यांनीपत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावरून पंतप्रधान मोदींना चांगलंच घेरल.

तासाला २ दोन बेरोजगार तरुण आत्महत्या करत आहेत ; तरीही मोदींचा ग्राफ वरतीच ; पवन खेरांनी सुनावले
X

शेतमालाला एमेएसपी (MSP) इतर मागण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, काँग्रेस ने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.या संदर्भात काल काँग्रेस कडून पत्रकार परिषद घेत, शेतकरी ज्या मागण्या करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ भाष्य करण्यात आले व काँग्रेस शेतकऱ्यांच्या बाजूने असल्याचे सांगितले

पत्रकारांच्या प्रश्नावरून पवण खेडा यांनी पंतप्रधान मोदींना धरल धारेवर

सध्या शेतकरी आंदोलकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात 'हे शेतकरी आंदोलन पंतप्रधान मोदींचा ग्राफ खाली आणण्यासाठी सुरू आहे' असे काही आंदोलक म्हणत आहेत. यासंदर्भात पत्रकारांनी पवन खेडा यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देतांना पवन खेडा म्हणाले.

शेतकऱ्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करावा यात काही गैर आहे का ?

जर शेतकऱ्यांना वेगळ्या प्रकारची राजकीय व्यवस्था हवी असेल तर त्याच्यात चूक काय आहे ?. जर शेतकरी मोदींना हरवयचं अस म्हणत असतील तर ते देशद्रोही कशे ठरवता ? २०१४ तुम्ही सगळे बोलत होते काँग्रेस ला हरवायचे आम्ही तर तुम्हाला देशद्रोही नाही घोषित केले.

मोदींचा ग्राफ हा आर्टिफिशियल इतेलिजेंस चा चुकीचं वापर करून बोटस च्या माध्यमातून वाढवण्यात आला आहे, हे सगळ्यांना माहीत आहे.

वेळ येऊद्या सगळे तीहाड जेलमध्ये असतील असही पवन खेडा म्हणाले

ग्राफ वरती ठेवण्यासाठी मीडियाचा कसा वापर केला जातो. न्यूज चॅनल च्या मालकांवर कसा दबाव टाकला जातो. काय देवाणघेवाण होते, हे आम्हाला माहीत आहे. कोण आहे हिरेन जोशी ? न्यूज चॅनल च्या मालकांना यांचे का मेसेज येतात ? असे प्रश्नही पवन खेडा यांनी उपस्थित केले.

हिरेन जोशी कोण आहेत ?

हिरेन जोशी पंतप्रधान मोदींच्या डिजिटल माध्यमांवर पोस्ट होणाऱ्या प्रत्येक गोष्टी साठी जबाबदार आहेत. पंतप्रधानांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील प्रत्येक गोष्ट प्रथम हिरेन जोशी यांच्या नजरेतून जाते आणि त्यांच्याकडून हिरवा सिग्नल मिळाल्यानंतरच पोस्ट केली जाते.

हिरेन जोशी पंतप्रधान मोदींच्या वेबसाइट, ब्लॉग, सोशल मीडिया अकाऊंट्स (ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम इ.) च्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवतात.अकेन विरोधी पक्षांनी हिरेन जोशिंवर न्युज चॅनेलच्या मालकांना सत्ताधारी पक्षाच्या अजेंड्याच्या बातम्या चालविण्यास दबाव टाकत असल्याचे अरू केले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हिरेन जोशी यांच्यावर वृत्तवाहिन्यांचे मालक आणि संपादकांना गैरवर्तन केल्याचे गंभीर आरोप केले होते.

मोदींचा ग्राफ वाढता दाखवण्यासाठी हेडलाईनस मॅनेज केल्या जात आहेत, जर कोणी योग्य मागण्या घेऊन हा ग्राफ खाली आणण्यासाठी रस्त्यावर उतरलं आहे तर काय चूक आहे. सत्य काय आहे मोदींनी स्वतः बाहेर येऊन पहावे, शेतकऱ्यांना भेटावे बेरोजगारांना भेटावे, एका तासात दोन व्यक्ती आत्महत्या करत आहेत तरीही मोदींचा ग्राफ आपल्याला वर दिसत आहे अशा परखड शब्दात पवन खेडांनी मोदींवर निशाणा साधला.

Updated : 16 Feb 2024 4:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top