Home > Max Political > गोव्यात महुआ मोइत्रा विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगणार, महुआ मोइत्रा यांच्याकडे गोवा विधानसभेची जबाबदारी

गोव्यात महुआ मोइत्रा विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगणार, महुआ मोइत्रा यांच्याकडे गोवा विधानसभेची जबाबदारी

TMC appoints Mahua Moitra as State in-charge of Goa Election its trouble for Devendra Fadnavis गोव्यात महुआ मोइत्रा विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगणार, महुआ मोइत्रा यांच्याकडे गोवा विधानसभेची जबाबदारी

गोव्यात महुआ मोइत्रा विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना रंगणार, महुआ मोइत्रा यांच्याकडे गोवा विधानसभेची जबाबदारी
X

आपल्या आक्रमक भाषणांमुळे भारतात चर्चेत असलेल्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याकडे ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभा निवडणूकीची जबाबदारी दिली आहे. तर भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेली आहे. त्यामुळे आता गोवा विधानसभा निवडणूकीत महुआ आणि फडणवीस यांच्यामध्ये सामना रंगण्याची चिन्हं आहेत. पुढील वर्षी फेब्रवारीमध्ये गोव्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत.

कॉंग्रेस नेते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईसिन फालेरो यांनी 29 सप्टेंबरला तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तृणमूल कॉंग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टीने देखील गोव्यात एन्ट्री केल्याने राजकीय लढाई अधिक रंजक होण्याची शक्यता आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 13 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवून गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. मात्र, भाजपने तडजोड करत सरकार स्थापन केलं होता.

Updated : 13 Nov 2021 1:21 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top