Home > Max Political > वेळ अजूनही आहे, शाहूराजेंनी आपल्या उमेदवारीचा विचार करावा - हसन मुश्रीफ

वेळ अजूनही आहे, शाहूराजेंनी आपल्या उमेदवारीचा विचार करावा - हसन मुश्रीफ

वेळ अजूनही आहे, शाहूराजेंनी आपल्या उमेदवारीचा विचार करावा - हसन मुश्रीफ
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेले छत्रपती शाहू महाराज यांना वारंवार राजकारण्यात न येण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर असून त्यांनी लोकसभेच्या निवडणूकीसाठी रिंगणात उतरू नये, असा सल्ला देत हसन मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी छत्रपती शाहू राजे यांच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा विषय छेडला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघातील झालेल्या महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी शाहू महाराजांना लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात फेरविचार करण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे, परंतु ते लोकसभेचे उमेदवार म्हणून एका पक्षाचे झाले आहेत. त्यामुळे ते वादात सापडले जाणार हे उघड सत्य आहे. म्हणूनच मी त्यांना पूर्वीपासूनच राजकारणात येऊ नये, अशी विनंती केली आहे. अजूनही वेळ आहे, त्यांनी आपल्या उमेदवारीबाबत फेरविचार करावा, सल्ला मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना दिला.

Updated : 12 April 2024 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top