Home > Max Political > मंत्री गुलाबराव पाटलांवर कोर्टाने ठोकला 500 रुपयांचा दंड....

मंत्री गुलाबराव पाटलांवर कोर्टाने ठोकला 500 रुपयांचा दंड....

मंत्री गुलाबराव पाटलांवर कोर्टाने ठोकला 500 रुपयांचा दंड....
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात दाखल केलेल्या पाच कोटींच्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मंत्री गुलाबराव पाटील सुनावणीला गैरहजर होते.पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी आपल्या वकिलामार्फत सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, म्हणून अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने 500 रुपयांचा दंड करत गुलाबरावांचा अर्ज मंजूर केला. तसेच रजेचा अर्ज मंजूर करताना, उद्याचा सुनावणीचा दिवस सोडून पुढची तारीख मिळणार नाही, असं म्हटलंय.

एकनाथ खडसे गुलाबराव पाटील अब्रूनुकसानी या खटल्याची पुढील सुनावणी आता 21 जून रोजी ठेवली आहे.

भाजप सेना युती सरकारमध्ये खडसे बारा खात्यांचे मंत्री असताना गुलाबराव पाटलांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर करून सरकारकडून लाखो रुपयांचे अनुदान लाटण्याचा आरोप केला होता. या आरोपासंदर्भात एकनाथ खडसेंनी 2016 मध्ये गुलाबराव पाटलांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या खटल्याची आता नव्याने सुनावणी सुरू झाली आहे. या खटल्याची सुनावणी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी प्रितम नायगांवकर यांच्या कोर्टात सुरू आहे.

Updated : 20 Jun 2023 12:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top