Home > Max Political > पाडव्याच्या सभेनिमित्त ठाकरेंचा ट्रेलर लाँच, काय बोलणार राज ठाकरे? वाचा

पाडव्याच्या सभेनिमित्त ठाकरेंचा ट्रेलर लाँच, काय बोलणार राज ठाकरे? वाचा

पाडव्याच्या सभेनिमित्त ठाकरेंचा ट्रेलर लाँच, काय बोलणार राज ठाकरे? वाचा
X

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीची वारी करून आल्यापासून राज्यात मनसे महायुतीत सामील होणार का ? अशा चर्चांना उधाण आलं होतं. पण नेमकं काय घडतंय? असा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. अशातच राज ठाकरेंनी आता आपल्या X अकाउंटवरून गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या सभेचा ट्रेलर लाँच करीत मनसैनिकांना साद घातली आहे. मला आपल्याशी काहीतरी बोलायचंय, असं म्हणत ठाकरे यांनी नेमकं काय घडतंय? याबद्दल सर्व सांगणार असल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांना आपल्या मनसैनिकांना व तमाम राज ठाकरे प्रेमींना आगामी ९ एप्रिल ला गुढीपाडव्याच्या मेळाव्यानिमित्त शिवतिर्थावर या, नक्की काय काय घडलंय, काय घडतंय, हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचं आहे. अशा कॅप्शनच्या टॅगलाईन्स वापरून राज ठाकरेंनी गुढीपाडव्याचा ट्रेलर आपल्या अधिकृत X अकाउंटवरून रिलीज केला आहे.

Updated : 5 April 2024 7:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top