Home > Max Political > कल्याणमध्ये ठाकरेंचा उमेदवार ठरला आणि रद्दही झाला?

कल्याणमध्ये ठाकरेंचा उमेदवार ठरला आणि रद्दही झाला?

कल्याणमध्ये ठाकरेंचा उमेदवार ठरला आणि रद्दही झाला?
X

लोकसभा निवडणूकीच्या दृष्ट्रीने राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी चालू झाली आहे, तसेच वेगवेगळ्या पक्षांकडून त्यांचे उमेदवारही जाहीर करायला सुरुवात केली आहे. यामध्ये सगळ्याच मोठी यादी ही भारतीय जनता पार्टीने प्रसिध्द केली असून त्यात २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. तर, शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, शिवसेना शिंदे गटाने ७ उमेदवार, काँग्रेसने ७ उमेदवार, शरद पवार गटाने ५, आणि अजित पवार गटाने २ उमेदवार जाहीर केले आहेत. यापाठोपाठ आपल्या मतांचा राज्याच्या राज्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने सुध्दा उमेदवारांच्या जातीनिहाय उल्लेख करत दोन याद्या प्रसिध्द केल्या आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसंदर्भात आतार्यंत कुठल्याही पक्षाकडून ठोस असा निर्णय घेण्यात आला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे सद्याचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी उमेदवारी मिळणार की नाही याविषयी ठाम मत नव्हतं अशातच ठाकरे गटाने मात्र आपली बाजी मारत या मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली असा संभ्रम निर्माण करण्यात आला.

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या अयोध्या पौळ यांची X वरील पोस्ट :

शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटाच्या प्रवक्त्या असलेल्या अयोध्या पौळ यांनी आपल्या X हँडल अकाऊंट वरून आपल्याला कल्याण लोकसभा मतदारसंघाट उध्दव ठाकरेंकडून उमेदवारी देण्यात आली असल्याची पोस्ट शेअर केली. ज्यांच्याकडे ईडी, आयटी सारखी ताकद आहे असा स्वयंघोषित जागतिक स्तराचा सर्वात मोठा पक्ष सोबत युतीत आहे अशा मुख्यमंत्र्याच्या खासदार मुलाच्या विरोधात संधी दिल्याबद्दल त्यांनी उध्दव ठाकरे यांचे जाहीर आभार मानले.

अयोध्या पौळ यांनी ही पोस्ट व्हायरला झाल्यानंतर काहीच वेळात ती डिलीट केली, पण त्याअगोदर माध्यमात या बातमीने राळ उडवून दिली.

शिवसेना ठाकरे गटाने १७ जागा जाहीर केल्या आहेत, पण कल्याण लोकसभेच्या जागेची उमेदवारी अद्याप घोषित केली नाही. पौळ यांनी X हँडल वर शेअर केलेली पोस्ट डिलीट केल्यामुळे माध्यमांमध्ये याचे तर्क-वितर्क लावले जात आहेत. जर ही पोस्ट एप्रिल फुल म्हणून शेअर केली असेल तर निवडणूकीच्या काळात याविषयी संभ्रण निर्माण केला जात असल्याच्या चर्चा आहेत.

अयोध्या पौळ यांनी केला X वरील पोस्टचा खुलासा :

कल्याण उमेदवारी मिळाल्यासंदर्भात X हँडलवर शेअर केलेल्या पोस्टविषयी खुलासा करताना म्हणाल्या की, ही पोस्ट एप्रिल फुल म्हणून शेअर केली असून या पोस्टमुळे त्यांच्या विरोधकांना आणि शुभचिंतकांना खुपच आवडली, असं त्या म्हणाल्या. ही पोस्ट शेअर केल्यानंतर ३ तासांत त्यांना २२८ मिसकॉल आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, कल्याण लोकसभेच्या उमेदवारीसंदर्भात पौळ असंही म्हणाल्या की, श्रीकांत शिंदेच काय उध्दव ठाकरे यांनी जर आदेश दिला तर नरेंद्र मोदी विरोधात देखील उमेदवारी अर्ज दाखल करावा लागेल.

आम्ही साहेबांचा आदेश मानणारे कट्टर अन निष्ठावंत सहकारी आहोत. धोका देऊन पळुन जाणारे गद्दार नाहीत, असा खोचक टोला त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.


Updated : 1 April 2024 7:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top