Home > Max Political > सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाप्रमुख एलन मस्कचा भारत दौरा रद्द - अनंत गाडगीळ

सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाप्रमुख एलन मस्कचा भारत दौरा रद्द - अनंत गाडगीळ

सत्ताबदलाच्या अंदाजामुळेच टेस्लाप्रमुख एलन मस्कचा भारत दौरा रद्द - अनंत गाडगीळ
X

जगातील एक बडे उद्योगपती आणि टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपला नियोजीत भारत दौरा लांबणीवर टाकला आहे. आता ते निवडणूक झाल्यानंतर भारतात येणार आहे म्हणजे या निवडणुकीनंतर देशात सरकार बदलणार आहे याचा अंदाज आल्यामुळेच एलन मस्क यांनी त्यांचा दौरा पुढे ढकलला आहे. फक्त देशातल्या जनतेलाच नाही तर जगभरातल्या लोकांना मोदी पुन्हा येऊ शकत नाहीत हे कळून चुकले आहे असे प्रतिपादन माजी आमदार व काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गाडगीळ म्हणाले की, दुसऱ्या एखाद्या देशात मोठी आर्थिक गुंतवणूक करण्या-या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करण्यापूर्वी त्या देशातील आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करतात काही कंपन्या तर सामाजिक परिस्थितीवरही लक्ष ठेवून असतात. या कंपन्यांच्या प्रमुखांच्या दौ-यांचे नियोजन कित्येक महिने अगोदरच केले जात असते. संबंधीत देशात सत्तेवर कोणते सरकार असणार हा ही एक कंपन्यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा असतो. असे असताना टेस्ला या प्रसिध्द कंपनीचे मालक एलन मस्क यांनी भारत दौरा आता लांबणीवर टाकला आहे याचाच अर्थ भारतात निवडणूकांनतर सत्तापरिवर्तन होणार आहे याचा त्यांना अंदाज आला आहे. देशातल्या जनतेलाही हा अंदाज आलेला आहे. कितीही ४०० पारच्या गप्पा मारल्या तरी मोदी पुन्हा सत्तेवर येणार नाहीत. मोदी आणि भाजपचा पराभव निश्चित झालेला आहे असे गाडगीळ म्हणाले.

Updated : 21 April 2024 4:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top