Home > Max Political > मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात खड्डा? रस्त्यावरील खड्डे बुजवा टेंभुर्णीच्या नागरिकांचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात खड्डा? रस्त्यावरील खड्डे बुजवा टेंभुर्णीच्या नागरिकांचे आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यात खड्डा? रस्त्यावरील खड्डे बुजवा टेंभुर्णीच्या नागरिकांचे आंदोलन
X

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला जोडणारा राजमार्ग 65 वर पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. टेंभुर्णी येथे कायम स्वरूपी वर्दळ असते. पुणे, मुंबई, लातुर, सोलापूर, कर्नाटक, आन्ध्रप्रदेश आणि मराठवाडा या भागात या ठिकाणावरुन वाहतुक होत असते. मात्र, टेम्भुर्णी येथे हा सोलापूर हायवे खड्डेमय झाला आहे. त्यामुळे कित्येक नागरिकांना आपला जीव देखील धोक्यात घालावा लागत आहे.

उद्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विठ्ठलांच्या पुजेसाठी पंढरपूर येथे याच रस्त्याने जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेने हा प्रश्न सरकारपर्यंत पोहोचावा रास्ता रोको करत रस्त्याच्या खड्डयांमध्ये झाडे लावली आहेत.

पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्याची द्रुतगती हुन दूरगती कडे वाटचाल सुरू आहे. पावसाच्या पाण्यामुळे या राज्यमार्गावर गुडघ्याएव्हढे पाणी साचत आहे. आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण अजून वाढलेलं आहे. टेंभुर्णीतील रहदारीचे नागरिक या परस्थितील आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी झाडे लावून प्रशासनाचं याकडे लक्ष वेधलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून या खडयांमुळे अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. पावसाच्या पाण्यामुळे चालकांना खड्डा आणि रस्ता समजून येत नाही आणि अपघात होत आहेत.

नागरिकांनी बांधकाम विभागाकडे तक्रार केली असता नागरिकांना हायवे विभागाकडे पाठवले जाते व हायवे विभागाकडे गेले असता जिल्हा परिषदे कडे पाठवले जात आहे. अशा प्रकारे सामान्य नागरिकांची दिशाभूल केली जाते आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यांनी या खड्यात झाडे लावून प्रशासनाला चपराक लावण्याची युक्ती केलेली आहे.

मात्र, यामुळे ही प्रशासनाला जाग आली नाही. तर नागरिक 2 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या नागकिरांनी दिला आहे.

दरम्यान अचानक केलेल्या या आंदोलन मुळे प्रशासनाची धावपळ उडाली आहे. महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी गावकऱ्यांशी फोनवरून सवांद साधत दोन दिवसात रस्ता दुरूस्त करण्याचे आश्वासन दिलं असून नागरिकांनी आंदोलन स्थगित केलं आहे.

Updated : 19 July 2021 4:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top