Home > Max Political > तेलंगणा सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का नाही..? राजकुमार बडोले

तेलंगणा सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का नाही..? राजकुमार बडोले

तेलंगणा सरकारला जे जमलं ते ठाकरे सरकारला का नाही..? राजकुमार बडोले
X

माजी समाजकल्याण मंत्री आणि भाजपचे नेते राजकुमार बडोले यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनुसूचित जाती- जमातीच्या सगळ्या योजना बंद करण्यात आल्या असल्याचा आरोप केला आहे. तसंच तेलंगणा सरकारने प्रत्येक विधानसभेतील १००-१०० कुटूंबांच्या खात्यावर १० लक्ष रुपये निधी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर तेलंगणा सारखं राज्य हा निर्णय घेऊ शकतं तर महाराष्ट्र का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

काय म्हटलंय बडोले यांनी..

अनुसूचित जाती-जमातींना आत्मनिर्भर कसे करावयाचे तर तेलंगणा सरकारकडून शिकावे. तेलंगणा सरकारने अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लोकांना आत्मनिर्भरतेसाठी मदतीचा हात दिला. प्रत्येक विधानसभेतील १००-१०० कुटूंबांच्या खात्यावर १० लक्ष रुपये निधी देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला. देशात असा क्रांतिकारी निर्णय घेणारा पहिला राज्य ठरला. तिथे अनुसूचित जाती अनु जमातींच्या सुशिक्षित बेरोजगारांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. ते सुध्दा विनाविलंब देते.

महाराष्ट्रात मात्र, अनुसूचित जाती- जमातीच्या सगळ्या योजना बंद करण्यात आल्यात. अनु .जाती जमातींच्या महामंडळांना मागील दीड वर्षापासून निधी दिला नाही.

अनु जाती जमाती आयोगातील अध्यक्ष व सदस्य पद भरण्यात आले नाही, त्यामुळे आयोगाकडे ५००० प्रकरणं पडली आहेत. त्यावर सुनावणी नाही. लोक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. हे आमचे पुरोगामी सरकार..!

जो महाराष्ट्र महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, व परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभुमी आहे, फुले, शाहु, आंबेडकरांचा वारसा सांगते. त्या महाराष्ट्रात योजना ठप्प आहेत. प्रगतीला खीळ बसली. उलट अनु जाती- जमातींवर अत्याचार वाढले. त्याकडे सरकारचा कानाडोळा आहे. कमीलीचे दुर्लक्ष आहे.

किंबहूना सरकार स्वत: या समाजावर अन्याय करीत आहे.

पदोन्नतीतील आरक्षण संपविले आहे. हे सरकार अनूसुचित जाती अनुसुचित जमाती यांच्या विरोधात आहे. आपल्या कृतिने सिद्ध करीत आहे. या महाविकास आघाडी सरकारने ऊच्च न्यायालयात अनुसुचित जाती, अनुसुचित जमातींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची गरज नाही. असे न्यायालयास संमतीपत्र दिले. त्यातून हे सरकार जाती-जमातींची शत्रू असल्याचे सिद्ध झाले आहे.

रात्र वैऱ्याची आहे.

जाती व जमातींनी वेळीच जागे होण्याची गरज आहे. वेळ निघून गेली तर हात चोळत बसावे लागेल. जागे व्हा ! व्यक्त व्हा!! तयारीला लागा!!! चला सर्व मिळून सरकारला जागवू या...!

-राजकुमार बडोले,

माजी सामाजिक न्यायमंत्री,

महाराष्ट्र.

Updated : 3 July 2021 7:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top