Home > Max Political > सुशीलकुमार शिंदे भाजप च्या वाटेवर...?

सुशीलकुमार शिंदे भाजप च्या वाटेवर...?

सुशीलकुमार शिंदे भाजप च्या वाटेवर...?
X

सोलापूर : दोन वेळा पराभव होऊन देखील भाजपने मला आणि माझी मुलगी प्रणिती शिंदे हिला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. अशी माहिती माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज दिली. मात्र भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही. या संदर्भामध्ये उत्तर देणे हे सुशीलकुमार शिंदे यांनी टाळल. प्रणिती शिंदे भाजप मध्ये जाणार का? या प्रश्नावर उत्तर देत असताना प्रणिती शिंदे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी दिले.





भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सुशीलकुमार शिंदे त्यांना भाजपमध्ये येण्याची कोणतीही ऑफर दिली नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. मात्र उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूर मध्ये भेट घेतली. सुशीलकुमार शिंदे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागत. अशी प्रतिक्रिया देखील भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने अधिकृत ऑफर दिली नाही. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शिंदे यांचे चांगले मित्र आहेत. त्यांनी ऑफर दिली असल्यास मला माहित नाही. असे देखील वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.





नितीन गडकरी यांनी मला ऑफर दिली नाही. ऑफर देणारा हा मोठा नेता आहे. त्याच मी नाव घेऊ शकत नाही. अशी प्रतिक्रिया सुशीलकुमार शिंदे यांनी दिली आहे. यावेळी प्रणिती शिंदे यांच्या बद्दल बोलत असताना. त्यांच्या मनातलं मला माहित नाही. प्रणिती शिंदे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. असे भाष्य करत भाजपमध्ये जाणार की नाही यासंदर्भात स्पष्ट वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी टाळले आहे.




Updated : 17 Jan 2024 5:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top