Home > Max Political > सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढलं; अनंतराव थोपटेंच्या भेटीला सुनेत्रा पवार

सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढलं; अनंतराव थोपटेंच्या भेटीला सुनेत्रा पवार

सुप्रिया सुळेंचं टेन्शन वाढलं; अनंतराव थोपटेंच्या भेटीला सुनेत्रा पवार
X

पुणे : अनंतराव थोपटे आणि शरद पवार हे राज्याच्या राजकारणात नेहमी एकमेकांचे विरोधक म्हणून समोरं आले आहेत. त्यातच सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनंतराव थोपटे यांची घेतलेली भेट ही राजीकय चर्चांना उधाण देणारी आहे. याचं कारण असं की, सुरवातीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व भोर मतदारसंघावर आहे. या मतदार संघातून अनंतराव थोपटे हे सहा वेळेस आमदार राहिले आहेत. त्याच बरोबर ते मंत्री देखील राहिले आहेत. यानंतर त्यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे देखील तीन टर्म आमदार आहेत. पवार आणि थोपटे हे राजकीय विरोधक असले तरी अनंतराव थोपटे यांनी पुर्व सुप्रिया सुळे यांचा छुपा प्रचार केला होता, अशी माहिती समोर येते.

याचं कारण असं की, बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंना भोर, वेल्हा मुळशी मतदारसंघातून लीड मिळवण्यासाठी थोपटे यांचा मोठा वाटा राहिला होता. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भोर, वेल्हा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होते. या विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अनंतराव थोपटे यांचं राजकीय प्राबल्य दिसून येतं. मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर थोपटे कोणाचा प्रचार करतील? असा सवाल निर्माण झाला आहे. ह्याचं कारण सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांची घेतलेली भेट आणि त्या मुळे सुरू झालेली राजकिय चर्चा.

लोकसभे च्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांची निवडणुक ही चर्चेचा विषय बनली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये नणंद सुप्रिया सुळे विरोध भावजाई सुनेत्रा पवार अशी लढत रंगानार असल्याने. या दोन्ही उमेदवारांनी तयारीला देखील सर्वात केली आहे. यातच सुनेत्रा पवार यांनी माजी मंत्री अनंतराव थोपटे, व सह कुबांची भेट घेतली. हे थोपटे कुटूंब पुर्वी लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळे यांना राजकीय मदत करायचे अशी चर्चा आहे. मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर सुनेत्रा पवार यांनी अनंतराव थोपटे आणि कुटुंबीयांची भेट घेतल्या नंतर नेमाक कोणाचं पार्ड थोपटे जड करणार ह्या विषयी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर अनंतराव थोपटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचरपासू केली. भोर तालुक्यच्या दौरा दरम्यान सुनेत्रा पवार यांनी थोपटे कुटूंबाला भेट दिली, दरम्यान अनंतराव थोपटे, आमदार संग्राम थोपटे, पत्नी स्वरूपा थोपटे, मुलगा पृथ्वीराज थोपटे उपस्थित होते. ह्या वेळेस राजकीय चर्चा झाल्याचेही समोर येत आहे. या मुळेच महाविकास आघाडी पक्षातील आणि काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिलेले संग्राम थोपटे येणाऱ्या काळात सुनेत्रा पवार यांना मदत करतील का? की सुप्रिया सुळे यांच्या सोबत महविकास आघाडी म्हणून सोबत राहतील अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Updated : 2 March 2024 1:03 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top