Home > Max Political > भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी शरद पवार घेणार पुढाकार

भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी शरद पवार घेणार पुढाकार

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का, शरद पवार मोदींविरोधात राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व करणार का, राहुल गांधींचे काय चुकते आहे या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं शरद पवार यांनी दैनिक लोकतमला दिलेल्या मुलाखतीत दिलेली आहेत.

भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडीसाठी शरद पवार घेणार पुढाकार
X

नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. दैनिक लोकमतसाठी लोकमत मीडियाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. संसदेचे अधिवेशन आता जवळ आले आहे आणि याच काळात राष्ट्रीय आघाडीसाठी चर्चा होईल असेही त्यांनी सांगितले. पण विरोधकांना एकत्र आणताना या आघाडीचे नेतृत्व सर्वमान्य असले पाहिजे अशी आपली भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले. पण याआधीच्या निवडणुकीत विरोधक एकत्र आले नाहीत ही चुक होती हेदेखील त्यांनी मान्य केले. नरेंद्र मोदींविरोधात एकत्र येण्यापेक्षा पर्यायी कार्यक्रम घेऊन उतरावे लागेल असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?

सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा केंद्रात जास्त रस आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावरील उत्तरा दरम्यान शरद पवार यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी एखादी मिहिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी असे वक्तव्य भाजपचे नेते आशीष शेलार यांनी केले होते. यानंतर सुप्रीया सुळे यांचे नाव चर्चेत आले होते.

राहुल गांधींकडे सातत्याचा अभाव

याच मुलाखती दरम्यान शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वासंदर्भातल्या प्रश्नावर उत्तर देताना राहुल गांधी यांचे काम चांगले आहे पण त्यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचे मत व्यक्त केले आहे. देशातील दुसऱ्या नंबरच्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे सोनिया आणि राहुल गांधी नेते आहेत तसंच काँग्रेसमधील अनेक नेत्यांना गांधी-नेहरु विचारांचे आहेत. त्यामुळे त्यांचे आकर्षण असणे आपण मान्य केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Updated : 3 Dec 2020 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top