Home > Max Political > सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; जयंत पाटलांविषयीच्या चर्चेवर काय म्हणाल्या ? वाचा

सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; जयंत पाटलांविषयीच्या चर्चेवर काय म्हणाल्या ? वाचा

सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका; जयंत पाटलांविषयीच्या चर्चेवर काय म्हणाल्या ? वाचा
X

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या कृष्णकुंज बंगल्यावर भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांची तासभर चर्चा झाली असं सांगण्यात येत आहे. त्यांच्या भेटीनंतर महायुतीला पाठींबा मिळविण्यासाठीच ही भेट झाली आहे, अशा चर्चांना उधान आलं आहे. त्याचबरोबर लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होणार असल्याचंही बोललं जात असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षावर खोचक टीका केली आहे.

राज ठाकरेंशी, आशिष शेलार भेटल्यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. परंतु त्यात त्यांनी भेटीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामूळे अनेकांच्या मनात यामूळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. याविषयी माध्यमांनी सुप्रिया सुळेंची विचारणा केली असता त्यांनी त्यावर खोचक पध्दतीने प्रतिक्रिया दिली. 'घरं फोडली, पक्ष फोडले, आणि आता राज ठाकरेंना भेटायला गेले. त्यांनी कितीही ताकत लावली, पक्षापक्षांत फोडाफोडीचं राजकारण केलं, सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीचा वापर केला, तरी त्यांना आत्मविश्वास नाही की, ते जिंकू शकतील. असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

Updated : 19 Feb 2024 10:46 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top