Home > Max Political > अमित ठाकरेंना हनुमान चालीसा वाचायला पाठवा, सुजात आंबेडकर राज ठाकरेंवर बरसले....

अमित ठाकरेंना हनुमान चालीसा वाचायला पाठवा, सुजात आंबेडकर राज ठाकरेंवर बरसले....

अमित ठाकरेंना हनुमान चालीसा वाचायला पाठवा, सुजात आंबेडकर राज ठाकरेंवर बरसले....
X

राज ठाकरे यांनी आपला संपलेला पक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर उभा करण्याचा प्रयत्न करु नये, य़ा शब्दात सुजात प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांची पहिली राजकीय सभा रविवारी मुंबईत झाली. यावेळी सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यावर जोरदार टीका केली. "अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला १०० टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नका जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही. माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती आहे, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या मात्र तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणाऱ्या दंगलीवर उभा करू नका. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांसमोर केले आहे त्यामुळे दंगली झाल्या तर कोणाला अटक याबाबत संभ्रम नको." असे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.

"वंचितांची सत्ता स्थापन करायची असेल तर खूप जास्त मेहनत करावी लागेल. घरोघरी जाऊन आपला संपर्क वाढवला पाहिजे" असे आवाहन त्यांनी केले. "मागील दोन निवडणुकांमध्ये आपण पहिले फक्त आपल्या समाजातील ताकदीवर निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समजतील मतदाता जोडता आला पाहिजे. त्या परीने प्रयत्न करा. आपला समाज सोडून इतर समाजातील तीन व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचा मतदाता म्हणून तयार करा. पुढच्या निवडणुकीत अपयशाचं हे चित्र नक्की पालटलेलं असेल. प्रस्थापित पक्ष हे सिंडिकेट राजकारण करून वंचित वर्गाला वंचितच ठेवण्यात धन्यता मनात आहे." असा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रवादीला टोला

आपल्य़ा भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. "वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे याचा प्रत्येकाने विचार करावा." असा टोला त्यांनी लगावला. "लाटेवरती स्वार होऊन कोणीही निवडणूक जिंकू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तम उदाहरण आहे", अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. येणारा काळ खूप अवघड आहे, त्यामुळे आपल्याविरुद्ध खूप अपप्रचार केला जाणार आहे. निवडणूका जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा, रिसोर्सेस, ताकद नाही मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे जिद्द, असे आवाहनही त्यांनी केले.

Updated : 5 April 2022 11:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top