नांदेडमधील काँग्रेस आमदाराच्या गाडीवर दगडफेक
X
मराठा आरक्षणावरून महाराष्टात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सध्या रास्ता रोको आंदोलनं केली जात आहेत. यातच शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास नांदेड शहरालगत असलेल्या पुंड पिंपळगाव या गावात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या नांदेड दक्षिणच्या काँग्रेस आमदाराच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असल्याची घटना घडली. या दगडफेकीमुळे गाडीचे काचं फुटले असुन आमदार मोहन हंबर्डे सुरक्षित असल्याची माहिती आहे. तर घटनेनंतर गावात काही वेळ तणावाचं वातावरण निर्णाण झालं होतं.
या कार्यक्रमासाठी आमदार मोहन हंबर्डे हे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास गेले होते. गावात प्रवेश करताच मराठा आंदोलकांकडुन 'एक मराठा लाख मराठा' अशा घोषणा देत त्यांचा विरोध केला. त्यानंतर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी मोहन हंबर्डे हे गाडीतून बाहेर आले आणि काही वेळातच आंदोलकांनी गाडीवर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. दरम्यान काही महिन्यांपूर्वी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती.