Home > Max Political > आज राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली; बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

आज राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली; बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

आज राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली; बैठकीत हे निर्णय घेण्यात आले
X

आज राज्य मंञीमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली, या बैठकीमध्ये मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत. मुंबईकरांना यावर्षी मालमत्ता करात वाढ झालेली नाहीये त्यामूळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. राज्यामध्ये नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार, त्याचबरोबर २ लाख स्वयंरोजगार निर्णाण करणार तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी शासन संवेदनशील असल्याचं सुध्दा या बैठकीतून समोर आलेलं आहे.


मुख्यमंञी श्री वयोश्री योजनेमधून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांना लाभ दिले जाणार आहेत. उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनूदान दिले जाणार आहे. त्याचबरोबर मध योजना संपूर्ण राज्यामध्ये राबवली जाणार आहे, या माध्यमातून मध उद्योगाला बळकटी मिळणार आहे. पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जून्नर तालूक्यामध्ये जंगल सफारी व्यवस्था आता सुरु होणार आहे. यासंदर्भात महत्वाचे आणि मोठे निर्णय आजच्या या राज्य मंञीमंडाळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

Updated : 5 Feb 2024 1:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top