Home > Max Political > श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार...!

श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार...!

श्रीकांत शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार...!
X

श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यावरच श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, पत्राचाळचे आरोपीपत्र लिहायला लागलेत. त्यांचा मोंदीवरील विश्वास वाढलेला दिसतोय, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

दरम्यान श्रीकांत शिंदे म्हणाले की, मला त्या पत्रावर हसावे का रडावे हेच कळत नाहीये. पत्राचाळ घोटाळ्यातील आरोपी आता पत्र लिहायला लागले आहेत. त्या पत्रामध्ये वैद्यकीय सेवा कशा प्रकारे केली जाते, कोणा कोणाला मदत करण्याचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून केले जाते याबाबत इत्यंभूत माहिती त्यांनी ठेवलेली आहे. त्यांच्या तोंडून शिव्याशापा शिवाय दुसरं काही येत नाही, असा खोचक टोला श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे.

तसेच पुढे श्रीकांत शिंदे म्हणाले, ''राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते पत्र लिहिले आहे. म्हणजे त्यांचा मोदींवरील विश्वास वाढलेला दिसतोय. जे पत्राचाळचे आरोपी आहेत त्यासाठी तुरुंगात जाऊन आलेत ते अशा प्रकारचे आरोप करतात याचा विचार जनतेने करावा. मीडिया आणि जनतेने या आरोपांना गांभीर्याने घेऊ नये'', असेही श्रीकांत शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

Updated : 15 April 2024 12:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top