जरांगेच्या हिंसक वक्तव्याची SIT चौकशी करा; नाना पटोलेंची मागणी
X
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची SIT चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आतापर्यंत झालेली चर्चा सर्वांसमोर यायला हवी, असं देखील पटोले म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनावर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आक्रमक चर्चा झाल्याची दिसून आले. जरांगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप सत्ताधाऱ्यांच्या आमदारांकडून करण्यात आले आहेत. त्यामूळे या प्रकरणाची SIT चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जरांगे पाटील यांची मागणी ही कायद्याच्या चौकटीत बसत नाही, तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी करणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.