Home > Max Political > शिवसेना VS शिवसेना ; RSS ही निशाण्यावर

शिवसेना VS शिवसेना ; RSS ही निशाण्यावर

शिवसेना VS शिवसेना ; RSS ही निशाण्यावर
X

शिवाजी पार्क आणि बीकेसी येथे ठाकरे आणि शिंदे गटाने दसऱ्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार तोफ डागली, मात्र यंदा ठाकरेंच्या निशाण्यावर RSS ही होती. मोहन भागवतांचे नाव घेऊन उध्दव ठाकरे यांनी काही सवाल उभे केले, तर एकनाथ शिंदे यांनी RSS च्या समर्थनार्थ जोरदार बॅटींग केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्रनिर्माणाच्या कार्यातलं योगदान विसरून उध्दव ठाकरे यांनी केलेली टीका अप्रस्तुत आहे असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेची आज मुंबईत टक्कर झाली. उध्दव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. आम्ही जर काँग्रेस सोबत युती करून हिंदुत्व सोडलं असेल तर मोहन भागवत यांनी मशि‍दीमध्ये जाऊन केलेली चर्चा काय मानायची. तो जर संवाद असेल तर मग आमच्यावर आरोप का? देशविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तान सोबत पंतप्रधानांनी चांगले संबंध ठेवायचे आणि शिवसेनेवर टीका करायची हा दुटप्पीपणा आहे असं म्हणत उध्दव ठाकरे यांनी संघ आणि भाजपावर हल्ला चढवला.

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या आरोपांना आपल्या भाषणात उत्तर दिले. दाऊदशी संबंध असलेल्यांच्या सोबतीने जाणार नाही असं उध्दव ठाकरे यांनी का स्पष्ट केले नाही असा सवाल शिंदे यांनी विचारला आहे. संघाच्या देशभक्तीवर शंका घेता येणार नाही, त्यांचे देश उभारणीत अमूल्य योगदान आहे असं शिंदे म्हणाले. भाजपासोबत युती केल्यानंतर प्रतारणा करून उध्दव ठाकरे यांनी जनतेचा विश्वासघात केला असा आरोप शिंदे यांनी केला

Updated : 5 Oct 2022 5:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top