ठाकरे गटाला दिलासा, शीतल म्हात्रे प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाला जामीन मंजूर
शीतल म्हात्रे यांच्या व्हिडीओ मॉर्फिंग प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यामध्ये आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयाला दिलासा मिळाला आहे.
X
शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre Morph Video) यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओचे पडसाद विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. त्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र अखेर बोरीवली न्यायालयाने (Borivali) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीयासह सात जणांना जामीन मंजूर झाला आहे.
शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले होते. त्यामध्ये युवा सेनेचे साईनाथ दुर्गे (Sainath Durge) यांचाही समावेश होता. मात्र साईनाथ दुर्गे यांच्यासह सात जणांना बोरीवली न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे हा उध्दव ठाकरे यांच्या गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
प्रकाश सुर्वे आणि शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटातील सात शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गे हेही तिथे होते. आज न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर साईनाथ दुर्गे आणि इतर सहा आरोपींना बोरिवली न्यायालयात परत आणले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केली आहे. या खटल्यात ज्येष्ठ वकील राजेश मोरे, अनिल पार्टे, प्राची पार्टे, मेराज शेख यांनी युक्तिवाद केला.
जामीन मंजूर झालेले शिवसैनिक :
1) साईनाथ दुर्गे
2)मानस अनंत कुवर
3) अशोक मिश्रा
4) रविन्द्र चौधरी
5) विनायक डायरे
6) अक्षय धनधर
7) यशवंत विचले
जामीन मंजूर करताना न्यायालयाच्या अटी-शर्ती
न्यायालयाने सात शिवसैनिकांना जामीन मंजूर केली असली तरी अजूनही काही निर्बंध कायम लागू ठेवले आहेत. या न पाळल्यास त्यांना परिणामांना सामोरे जावे लागू शकते. दर सोमवारी आरोपींनी दहिसर पोलिस ठाण्यात हजर होणे आवश्यक आहे. त्यांनी सोशल मीडिया वापरायचं नाही. मुंबई बाहेर कुठेहि जायचं नाही, अशा अटींवर आरोपींना 20 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) मते साईनाथ आमचा वाघ आहे.
साईनाथ दुर्गे यांना पोलीस कोठडीत घेण्यात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दादर येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. या क्षणी साईनाथ आमचा वाघ असल्याचे त्यांनी सांगितले आहे. अन्यायाविरुद्ध त्यांची लढाई सुरू आहे. या राज्यात मोगलाई आल्यासारखी धरपकड चालू आहे. खोटे आरोप करून तरुणांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही नेहमी त्याच्याशी लढा चालू ठेवू. युवासेना आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा वाघ असल्याने साई लढत राहणार आहे, अशा मोगलाईला कोणी घाबरत नाही. दुर्गे यांच्या कुटूंबियांशी भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, "हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही या अन्यायाविरुद्ध लढलो.