जम्मू काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यांवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा
X
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर शिवसेनेने सामनामधून मोदी सरकारच्या अपयशावर जोरदार टीका केली आहे. या हल्ल्याच्या 3 दिवस आधीच पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरमधील नेत्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. पण ही बैठक वरवरची ठरल्याचे या हल्ल्यांमधून दिसत असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
"कश्मीरमधील राजकीय हालचालींना वेग येत असतानाच फुटीरतावादी संघटना तसेच दहशतवादी टोळय़ाही आक्रमक झाल्याचे दिसते. जम्मू-कश्मीरमधील सर्वपक्षीय नेते म्हणजे 'गुपकार' गँगशी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांनी चर्चा केली. एकमेकांचे हसतमुख फोटो काढून प्रसिद्ध केले. या प्रकारास 72 तास होत नाहीत तोच जम्मू-कश्मीरात हिंसाचार व दहशतवादी हल्ल्यांचे थैमान सुरू झाले आहे. दहशतवाद्यांनी प्रथमच ड्रोनचा वापर करून जम्मू विमानतळावरील हिंदुस्थानी हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला केला आहे. अर्थात या हल्ल्यामागे पाकचा हात असणारच. ते काहीही असले तरी पोलीस, वायुसेना व संपूर्ण संरक्षण व्यवस्थेलाच हे आव्हान आहे. जेथे हल्ला झाला त्या हवाई दलाच्या तळापासून पाकिस्तानी सीमेपर्यंतचे अंतर 15 किलोमीटर आहे. सीमा भागातील दुश्मनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तेथे अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे. एखाद्या चिमणीइतक्या लहान पक्ष्याएवढा ड्रोन शोधणारी ही यंत्रणा असतानाही हवाई तळावर बॉम्ब फेकणाऱया ड्रोनना का शोधू शकली नाही? 'ड्रोन'चा वापर करून बॉम्बहल्ला झाला व आपल्या यंत्रणेस ते कळलेच नाही याचा काय अर्थ घ्यायचा?
या बॉम्बहल्ल्यांचा धमाका कानाचे पडदे फाडत असतानाच 'पुलवामा' जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका माजी पोलीस अधिकाऱयाची त्याच्या कुटुंबासह हत्या केली. या दोन्ही घटना चिंता वाढवणाऱया आहेत. हिंदुस्थानी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले करण्यात पाकडे दहशतवादी यशस्वी झाले आहेत.
370 कलम हटवल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी पंतप्रधान सर्वपक्षीय नेत्यांना भेटले. यापैकी बहुतेक नेत्यांना फुटीरतावादी, देशद्रोही, दहशतवाद्यांचे हस्तक वगैरे ठरवून दिल्ली सरकारने बंदिवान करून तुरुंगात ठेवले होते. त्याच नेत्यांबरोबर चर्चा करून प्रश्नांना गती द्यावी असे केंद्र सरकारला का वाटले? 370 कलम हटवल्यावर जम्मू-कश्मीरात अशांतता निर्माण होऊ नये म्हणून फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्तींसह अनेकांना तुरुंगात डांबलेच होते. हे सर्व लोक दिल्लीत चर्चेत सहभागी झाले. त्या चर्चेची हळद उतरली नसतानाच जम्मू-कश्मीरात दहशतवादी हल्ले सुरू झाले ही बाब चिंता वाढविणारीच आहे.
सरकारने घातलेल्या राजकीय निर्बंधांमुळेही परिस्थिती बिकट झाली. त्यामुळे दहशतवाद हाच रोजीरोटी कमविण्याचा एकमेव उद्योग बनला, हातात बंदुका घेण्यासाठी मिळणारा पैसा कश्मिरी तरुणांना मोहात पाडू लागला तर प्रकरण पुन्हा हाताबाहेर जाईल. लष्करावर दगड मारण्यासाठी कश्मिरी तरुणांना दहशतवादी टोळय़ा रोजंदारीवर पैसे देतात. रिकाम्या हातांना काम नसल्यामुळे त्यांना हातात दगड किंवा बंदुका घ्याव्या लागतात, असे सरकारचे म्हणणे असेल तर त्या रिकाम्या हातांना व रिकाम्या डोक्यांना दोन वर्षांत काय खुराक दिला?
असा सवालही सामनामधून विचारण्यात आला आहे.
URL – all accused sent to police custody in igatpuri rev party case
HEADLINE– इगतपुरीतील रेव्ह पार्टीप्रकरणी बॉलिवूडमधील 4 अभिनेत्रींसह सर्व आरोपींना पोलीस कोठडी
राज्यात कोरोनामुळे निर्बंध लागू केलेले असतानाही उच्चभ्रू वर्गातील काही जणांनी इगतपुरीमधील एका बंगल्यात रेव्ह पार्टी केल्याचे उघड झाले आहे. इगतपुरीमध्ये पोलिसांनी छापा घालून कारवाई केलेल्या या रेव्ह पार्टी प्रकरणी एकूण 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 4 आरोपीनां नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित 25 जणांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये सर्व जण हे उच्चभ्रू वर्गातील आहेत.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विलातील एका बंगल्यात २७ जून रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड कून 22 जणांना ताब्यात घेतले होते. पण आता या रेव्ह पार्टीत सहभागी असणाऱ्या व्यक्तींची संख्या 31 वर गेली असून त्यांना सोमवारी इगतपुरी न्यायालयात हजर करण्यात आले.
या रेव्ह पार्टीतमध्ये मुंबईतील मोठमोठ्या लोकांच्या मुलांचा यात सहभाग असल्याने इगतपुरी शहरात तर्क वितर्कांना वेग आला आहे. या कारवाईत ड्रग्ज , हुक्का, मादक द्रव्य, तसेच विदेशी दारु आढळली, तर इथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणी बिभत्स अवस्थेत, तोकड्या कपड्यांमध्ये आढळले होते. या रेव्ह पार्टी १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. त्यात आता वाढ झाली असून एकूण 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील चार महिला बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या व एका महिलेने बिग बॉस शोमध्ये काम केले आहे.
सोमवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रमुख 7 आरोपींपैकी 4 आरोपी ताब्यात आहेत तर 3 आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात पियुष भोगीलाल शेठीया (वय41), विक्रोळी, हर्ष शैलेश शाह(वय 27) घाटकोपर, नीरज ललित सुराणा ( वय 34) सांताक्रूझ, नायजेरियन ड्रग माफिया उमाही अबोणा पीटर (वय35), मिरा रोड, ठाणे अशा 4 जणांना 9 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामधील नसीम अलिम शेख, बांद्रा, सैफ नामक व्यक्ती, मुंबई व स्काय ताज विलाचा मालक रणवीर सोनी असे तीन जण फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी एक पथक मुंबईकडे रवाना झाले आहे. सरकारी वकील मिलिंद नेर्लेकर यांनी न्यायाधीशांसमोर बाजू मांडताना नायजेरियन ड्रग माफिया याच्या अटकेमुळे मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे वीला (बंगला) मालकासह 3 जणांचा शोध घेण्यासाठी इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली ती न्यायाधीशांनी मान्य केली.