News Update
Home > Max Political > दोन वर्षांनी भाजप शिवसेना नेते एका गाडीत...

दोन वर्षांनी भाजप शिवसेना नेते एका गाडीत...

दोन वर्षांनी भाजप शिवसेना नेते एका गाडीत...
X

भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर आणि भाजपला सत्तेपासून दूर केल्याने भाजप सेना नेत्यांमध्ये गेल्या दोन वर्षापासून वाद टोकाला गेला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने केला जात असताना आज गुलाबराव पाटील व गिरीश महाजन यांची जाहीर भेट झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

भाजप शिवसेना मधील दोन दिगग्ज नेते आज एकमेकांना भेटले. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन नाष्ट्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर दोनही नेत्यांनी एकाच गाडीत बसून पाहणी दौराही केला.

भाजप-सेना नेत्यांचा हा दोन वर्षानंतरचा समन्वयाचा दौरा चर्चेचा विषय ठरला. आणि जुन्या नव्या आठवणींना उजाळा ही देऊन गेला.

भाजप-शिवसेना युती गेले 25 वर्ष हिंदुत्वाच्या विचारधारेच्या मुद्यावर पक्की मैत्री असलेली राजकारणातील नैसर्गिक मैत्री असलेले दोनही राजकीय पक्ष. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढूनही सत्ता स्थापनावेळी शिवसेनेने भाजप ची 25 वर्षाच्या पक्क्या मैत्रीला तिलांजली दिली. आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर मैत्री करून राज्यात नव्या राजकीय समीकरणाला सुरवात केली. आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आले. शिवसेनेची विचारधारा आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचाराधारा परस्पर विरोधी पक्ष सत्तेसाठी एकत्र आले.

2019 च्या निवडणुकीत

भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यातही भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळूनही सत्तेबाहेर राहावं लागल्याचं शल्य बोचत असल्याचं भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये कायम वाक् युद्ध गेले दोन वर्षे महाराष्ट्राच्या जनता पाहत आहे. दोघेही पक्ष एकमेकांना कमी लेखण्यात कोणतीच कसर सोडत नाही. अगदी खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांची उनी दुनी काढत असतात. एकही दिवस असा जात नाही की एकमेकांवर टीका केली नाही.

मात्र, जळगाव जिल्ह्यातील दोन आजी माजी पालकमंत्री एकत्र आले. याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी महाजन यांच्या मतदार संघ असलेल्या जामनेर मध्ये अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं. शेतात पीक राहील नाही की घराचं छप्पर राहील नाही. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे दोघे नेते एकत्र आले होते

गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या प्रतिक्रिया-

गुलाबराव पाटील यांनी सांगितले की,

'आमच्या भेटीतून कोणताही राजकीय अर्थ काढू नये. आज अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकरी हा कोणत्याही पक्षाचा नाही. पालकमंत्री या नात्याने स्थानिक आमदारांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती जाणून घेणे, हा माझा हेतू होता.

ज्या वेळेस राजकीय विषय असेल तेव्हा आम्ही एकमेकांच्या विरोधात असू. परंतु, शेतकरी संकटात असताना एकमेकांतील मतभेद आणि राजकारण विसरून आम्ही एकत्र आलो आहोत',

असे सांगत गुलाबराव पाटील यांनी भेटीवर राजकीय भाष्य टाळलं.

गिरीश महाजन यांनीही यावेळी सांगितले की,

'या भेटीमागे कोणताही वेगळा विषय नाहीये. राजकारणाच्या ठिकाणी आम्ही राजकारण करू. पण आज परिस्थिती खूप वाईट आहे. शेतकऱ्याला धीर देण्याची गरज आहे. गेल्या आठवड्यात चाळीसगावात पूर परिस्थिती निर्माण झाली; त्यावेळेस देखील आम्ही दोन्ही नेते सोबतच होतो',

असे महाजन यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात तरी भाजप आणि शिवसेना नेते एकत्र येत आहेत. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी गुलाबराव पाटील यांनीच पुढाकार घेऊन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणलं होतं. मात्र, आजच्या भाजप - शिवसेना नेत्यांच्या भेटीत त्यांची बॉडी लँग्वेज जुन्या भाजप-सेना युतीची आठवण करून देत होती.

Updated : 10 Sep 2021 4:04 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top