Home > Max Political > दानवेंची जीभ कापणाऱ्याला १२ लाखांची गाडी आणि दहा लाख रोख; शिवसेना नेत्याचे धक्कादायक विधान

दानवेंची जीभ कापणाऱ्याला १२ लाखांची गाडी आणि दहा लाख रोख; शिवसेना नेत्याचे धक्कादायक विधान

दानवेंची जीभ कापणाऱ्याला १२ लाखांची गाडी आणि दहा लाख रोख; शिवसेना नेत्याचे धक्कादायक विधान
X

यवतमाळ: दिल्ली- हरियाणा सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांबद्दल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या या विधानाच्या विरोधात शनिवारी राज्यभरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.याचाच भाग म्हणून यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.मात्र यावेळी शिवसेनेचे नेते संतोष ढवळे यांनी रावसाहेब दानवे यांची जीप कापणाऱ्याला बक्षीस देण्याचं धक्कादायक वक्तव्य केलं.

शनिवारी यवतमाळमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी इंधन दरवाढ तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान संतोष ढवळे यांनी रावसाहेब दानवे याची जीभ कापणाऱ्या व्यक्तीला 12 लाखांची गाडी आणि 10 लाख रोख रक्कम मी दिली जाईल असं विधान केलं. त्यामुळे त्यांच्या या विधानाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


Updated : 12 Dec 2020 3:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top