Home > Max Political > YogiAdityanathयोगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते: सामना

YogiAdityanathयोगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते: सामना

मुंबईतील बडय़ा उद्योगपतींवर (industrialist)प्रभाव टाकण्यासाठी योगीजी (YogiAdityanath)अवतरले व त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत ‘रोड शो’ करण्याची गरज काय?असा खडा सामना संपादकीयमधून योगींच्या रोड शोवर उपस्थित करण्यात आला आहे.

YogiAdityanathयोगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते: सामना
X

उत्तर प्रदेश (UttarPradesh)हे विकासाचे इंजिन आहे व त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत (Mumabai)उतरले. मुंबईतील बडय़ा उद्योगपतींवर (industrialist)प्रभाव टाकण्यासाठी योगीजी YogiAdityanath)अवतरले व त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत 'रोड शो' करण्याची गरज काय?असा खडा सामना संपादकीयमधून योगींच्या रोड शोवर उपस्थित करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह अनेक उद्योगपती आणि अभिनेत्यांचीसुद्धा भेट घेतली. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेनेने भाजपाला लक्ष्य केलं आहे. योगी आदित्यनाथ यांचा हा दौरा भाजपा पुरस्कृत राजकीय खेळ असून उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका (MCGM)निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारवर टीका करताना सामना संपादकीय मधून गुंतवणुकीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे अडीच लाख कोटी गुंतवणुकीचे नुकसान आधीच झाले आहे. दोन लाख लोकांचा रोजगारही बुडाला. हे सर्व रोजगार व गुंतवणूक गुजरातेत वळवण्यात आली. मुंबईच्या बाबतीत ही अशी लांडगेतोड सुरू आहे. तरीही 'अतिथी देवो भव' या नात्याने योगींचे स्वागत आहे, पण मुंबईच्या इंधनावर तुमच्या विकास इंजिनाची गती वाढते. त्यामुळे महाराष्ट्राशी इमान राखा. योगीजी हे भगव्या वस्त्रांतील सत्पुरुष आहेत, पण त्यांच्यात एक राजकारणीही दडला आहे. योगींना उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच आहे. तेव्हाही इंधन लागेलच! असाही टोला सामना संपादकीय मधून देण्यात आला आहे.उ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नित्यनेमाने मुंबई शहरात अवतरले. मुंबईतील उद्योगपती, गुंतवणूकदारांनी त्यांच्या राज्यात उद्योग सुरू करावेत यासाठी या भेटीगाठी आहेत. उत्तर प्रदेशच्या विकासास गती मिळावी म्हणून योगी महाराज वरचेवर मुंबई शहरात पधारत असतात. त्यात काही चूक आहे असे वरकरणी आम्हाला वाटत नाही. बिहार, उत्तर प्रदेश ही राज्ये औद्योगिकदृष्टय़ा मागास आहेत व त्या राज्यांतील मोठी लोकसंख्या रोजीरोटीसाठी स्थलांतरित झाली. मुंबई-दिल्लीत या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एका कळकळीने योगी आदित्यनाथ हे मुंबईस येतात, पण या वेळी येण्याआधी त्यांनी सर्वच वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती देऊन स्वतःची व आपल्या राज्याची प्रसिद्धी केली, अशी टीका सामना मधून करण्यात आली आहे.

'उत्तर प्रदेश हे नवीन भारताचे विकास इंजिन आहे. हे इंजिन तुमच्या व्यवसायाला नवीन वेग देणार,' असे या जाहिरातीत म्हटले आहे. उत्तर प्रदेश हा 'एक्सप्रेस प्रदेश' असून 6 एक्सप्रेस वे, 5 आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असल्याची माहिती योगींनी त्यांच्या जाहिरातीत दिली. उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे व त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले. मुंबईतील बडय़ा उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले व त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत 'रोड शो' करण्याची गरज काय? ताजमहल पॅलेस या कुलाब्यातील हॉटेलजवळ उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासासाठी योगी रोड शो करणार असल्याचे प्रसिद्ध झाले, पण प्रत्यक्षात हा रोड शो खरेच झाला काय? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

"ही भाजपा पुरस्कृत राजकीय खेळी"

"उत्तर प्रदेश हे विकासाचे इंजिन आहे. त्या इंजिनात इंधन भरण्यासाठी योगींचे विमान मुंबईत उतरले. मुंबईतील मोठ्या उद्योगपतींवर प्रभाव टाकण्यासाठी योगीजी अवतरले, त्याबद्दल त्यांचे स्वागत केले पाहिजे, पण गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी योगींना मुंबईत 'रोड शो' करण्याची गरज काय? योगींच्या रोड शोमध्ये नक्की कोणते उद्योगपती सामील झाले व त्यांनी योगी महाराजांवर त्या रोड शोमध्ये किती दौलतजादा म्हणजे गुंतवणूक केली, यावर सुद्धा प्रसिद्धी मिळाली पाहिजे. उद्योगपतींना भेटणे, आपल्या राज्याच्या उद्योगविषयक धोरणांबाबत प्रेझेंटेशन देणे वेगळे व त्या उद्योगपतींना आकर्षित करण्याच्या नावाखाली मुंबईत रोड शोचे आयोजन करणे वेगळे. योगींचा मुंबईतील रोड शो ही भाजपा पुरस्कृत राजकीय खेळी आहे. उद्योगपतींच्या नावाखाली मुंबई महानगरपालिका निवडणुकीत हिंदी भाषिक मतदारांची गुंतवणूक करण्याचा हा उद्योग आहे", अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

"योगीजींनी गुजरातमध्ये रोड-शो का करू नये?"

"योगी महाराज हे एक शहाणे व सरळमार्गी नेते आहेत. महाराष्ट्रातील फुटकळ नेत्यांच्या सल्ल्याने वागून त्यांनी स्वतःची अप्रतिष्ठा करून घेऊ नये. उत्तर प्रदेशच्या विकासात मुंबई-महाराष्ट्राने नेहमीच योगदान दिले आहे. मुंबईत लाखो हिंदी भाषिक रोजीरोटीसाठी येऊन चांगल्यापैकी स्थिरावले आहेत. त्यांच्याच अर्थकारणावर उत्तर प्रदेशात लाखो चुली पेटत आहेत. याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. शेवटी देश व समाज म्हणून आपण एक आहोत. उत्तर प्रदेशचा विकास मुंबई निवासी उद्योगपती करणार असतील तर ते चांगलेच आहे. त्यामुळे मुंबईवरील लोकसंख्येचा भार हलका होत जाईल. प्रश्न इतकाच आहे की, योगी महाराजांनी त्यांच्या राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मुंबईबरोबरच बाजूच्या गुजरात राज्यातही जायला हवे व गुंतवणूकदारांना लखनऊच्या दिशेने आकर्षित करण्यासाठी गांधीनगरच्या रस्त्यावर एखाद्या भव्य रोड शोचे आयोजन का करू नये?" असा प्रश्नही शिवसेनेने विचारला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही केलं लक्ष्य

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डावोस दौऱ्यावरूनही शिवसेनेनं खोचक टीका केली आहे. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री व इतर पन्नास लोकांची वरात डावोस येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेस निघाली आहे. परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी हे बिऱ्हाड त्यांची वरात घेऊन निघाले आहे. डावोस येथे १६ जानेवारीपासून जागतिक गुंतवणूक परिषद होणार आहे. या माध्यमातून ६० ते ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्याची तयारी महाराष्ट्रातील या बिऱ्हाडाने केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व त्यांचे बिऱ्हाड डावोसला जाऊन गुंतवणूकदारांच्या गाठीभेटी घेईल. गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी डावोसच्या रस्त्यांवर रोड शो नक्कीच करणार नाहीत", असे ते म्हणाले.


Updated : 6 Jan 2023 3:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top