Home > Max Political > नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का

शिंदे-फडणवीस(Shinde Fadanvis) सरकारला सत्तेवर येऊन सात महिने झाले असले तरी आजही शिंदे गटामध्ये सामिल होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. नाशिक महानगरातील ( Nashik Municipal Corporation )जेष्ठ शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत(Balasahebanchi Shivsena ) प्रवेश करुन शिंदे गटाला आपले समर्थन दिले आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला धक्का
X

हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन प्रथम ज्यांनी नाशिक( Nashik ) शहर व जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहचविण्यासाठी अथक परिश्रम केले. असे ज्येष्ठ शिवसैनिक यांनी आता बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन चाललेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या ठाणे (Thane)येथील निवासस्थानी बाळासाहेबांच्या शिवसेना(Balasahebanchi Shivsena ) पक्षाला समर्थन देत प्रवेश केला.

माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thakrey)यांच्या शिवसंवाद यात्रेच्या आधीच शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला धक्का दिला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक, माजी नगरसेवक, पदाधिकारी असे एकूण 50 पेक्षा अधिक शिवसैनिकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. ज्यांनी शिवसेना जिल्ह्यात रुजवली अशा शिवसैनिकांसोबत आनंद दिघे यांचे जुने सहकारी देखील यात सहभागी असून या सर्वांनी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कारभाराला कंटाळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

Updated : 6 Feb 2023 4:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top