Home > Max Political > मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा...

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा...

स्वबळाच्या नाऱ्यासह, हिंदूत्वाच्या मुद्द्यावरुन भाजपवर निशाणा, shiv sena will fight independently Uddhav Thackeray Shiv Sena Foundation Day

मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी दिला स्वबळाचा नारा...
X

महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आज शिवसेनेचा 55 व्वा वर्धापन दिन, Shiv Sena Foundation Day त्यानिमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापनाच्या दिवशी शरद पवार यांनी आगामी निवडणूका महाविकास आघाडी एकत्र लढेल. असा नारा दिला होता. त्यानंतर कॉंग्रेसने पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सामनातून कॉंग्रेसचा समाचारही घेण्यात आला होता.

आज त्याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील स्वबळाचा नारा देत आगामी काळात शिवसेना पुढील निवडणूका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं एक प्रकारे सूचक वक्तव्य केलं आहे. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूका होणार आहे. त्यादृष्टीने उद्धव ठाकरे यांचा संवाद महत्त्वाचा मानला जात आहे.

Updated : 19 Jun 2021 7:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top