Home > Max Political > शिंदे गट नसून भाजपनं पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा - संजय राऊत

शिंदे गट नसून भाजपनं पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा - संजय राऊत

शिवसेना पक्षात दोन गटातील वाद हा महाराष्ट्रभर चांगलाच गाजत आहे. रोज पत्रकारांशी संवाद साधतांना ठाकरे गटातील खासदार संजय राऊत 'शिंदे सरकार' वर टीका करत आहेत. यातच राऊतांनी शिंदे गटाला मिंधे गट बोलत मी त्यांना पक्ष म्हणून मानत नाही. असं वक्तव्य केलं आहे.

शिंदे गट नसून भाजपनं पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा  - संजय राऊत
X

माध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले, “शिंदे गट नसून भाजपने पाळलेल्या कोंबड्या खुराडा आहे. भाजपने कोंबड्यांचा खुराडा तयार केला आहे. कोणत्याही क्षणी त्यांना कापण्यात येऊ शकतं. त्यांचं बोलणं म्हणजे 'कोंबड्यांचं कॉक कॉक करणं' असा टोला देखील राऊतांनी लगावला आहे. निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह विकत दिलं म्हणजे ते पक्ष ठरत नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे 22 जागा लढवणार आहेत, या प्रश्नावर राऊत म्हणाले, शिंदेंनी 22 जागा लढवू द्या किंवा 48 जागा लढवू द्या त्यांचे पाच खासदार आले तर मी ती मोठी गोष्ट मानेन. मागच्या लोकसभेत आमचे १९ खासदार होते. यावेळी ती संख्या कायम राहिल, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

Updated : 26 May 2023 8:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top