Home > Max Political > शिवसेना ठाकरे गटाने केली उमेदवारांची घोषणा; मुंबई दक्षिण मध्यतून अनिल देसाईंना तिकीट, पहा यादी

शिवसेना ठाकरे गटाने केली उमेदवारांची घोषणा; मुंबई दक्षिण मध्यतून अनिल देसाईंना तिकीट, पहा यादी

शिवसेना ठाकरे गटाने केली उमेदवारांची घोषणा; मुंबई दक्षिण मध्यतून अनिल देसाईंना तिकीट, पहा यादी
X

लोकसभा निवडणूकीसाठी शिवसेना ठाकरे (UBT) गटाकडून उमेदवारांची पहीली यादी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या युतीत लढवल्या जाणाऱ्या निवडणूकीसाठी शिवसेनेच्या पहिल्या यादीत १६ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. अशी माहिती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून ट्विट करत दिली आहे.


दरम्यान संजय राऊत असंही म्हणाले की, पक्षाकडून एकुण २२ जागांवर निवडणूक लढवली जात आहे, उर्वरीत ५ नावांची घोषणा ही येत्या एक दोन दिवसात केली जाईल. ते म्हणाले की, हातकणंगले मध्ये शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीकडून पाठिबा मागितला आहे, त्यासंदर्भात आम्ही चर्चा करत आहोत.

शिवसेना (UBT) ने सध्याचे खासदार अरविंद सावंत यांना मुंबई दक्षिण, संजय पाटील यांनी मंबई उत्तर पूर्व आणि आमोल किर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाकडून सध्याच्या ५ खासदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरवलं गेलं आहे. आज जाहीर केलेल्या १६ उमेदवारांच्या नावांपैकी ११ नावांची घोषणा ही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मागच्या एक महिन्याच्या संबंधित लोकसभा मतदारसंघाचा दौऱा करत असनाच केली होती.

कल्याण लोकसभेच्या जागेसंदर्भात अजूनही ट्विस्ट कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे याच जागेवरून खासदार आहेत. शिवसेनेकडून आतापर्यंत एकुण १७ जागांवर उमेदवारांची घोषणा केली गेली आहे.

पक्षाकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना सुध्दा तिकीट देण्यात आलं आहे. आता लक्ष आहे ते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे, ज्यांना पक्षाकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा होती.

उमेदवारांची यादी-

१) बुलढाणा - नरेंद्र खेडेकर

२) यवतमाळ वाशिम - संजय देशमुख

३) सांगली - चंद्रहार पाटील

४) मावळ - संजय वाघेरे पाटील

५) हिंगोली - नागेश पाटील, आष्टीकर

६) संभाजीनगर - चंद्रकांत खैरे

७) धारााशिव - ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे

९) नाशिक - राजाभाऊ वाजे

१०) रायगड - अनंत गीते

११) सिंधूदुर्ग रत्नागिरी - विनायक राऊत

१२) ठाणे - राजव विचारे

१३) मुंबई ईशान्य - संजय दिना पाटील

१४) मुंबई दक्षिण - अरविंद सावंत

१५) मुंबई वायव्य - आमोल किर्तीकर

१६) परभणी - संजय जाधव

Updated : 27 March 2024 10:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top