Home > Max Political > शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंचे का? निवडणूक आयोगाविरोधात २० नोव्हेंबरला सुनावणी

शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरेंचे का? निवडणूक आयोगाविरोधात २० नोव्हेंबरला सुनावणी

New Delhi : शिवसेना पक्ष (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला (Shinde gut) देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध दाखल केलेत्या याचिकेवर दिवाळीनंतर सुनावणी होणार आहे. दिवाळीच्या सुट्यानंतर २० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. गेल्या वर्षी सत्तानंतर नाट्यानंतर शिवसेना पक्षात दोन गट पडले. शिंदे गटाच्या बंडखोरीयामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्या समर्थकांचे दोन गट झाले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस( Devendra fadnavis ) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

२० नोव्हेबरला होणार सुनावणी

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर येत्या २० नोव्हेबरला सुनावणी होणार आहे. या याचिकेवर ३१ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र, या दिवशी ईलोस्ट्रॉल बॉण्ड बाबत दिवसभर सुनावणी होणार असल्यामुळे ती पुढील महिन्यात होणार आहे.

विधानसभेपासून पक्ष संघटने पर्यंत शिंदे गटाकडे बहुमत

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना दिली आहे. आयोगाने आपल्या ७८ पाणी निर्णयात विधानसभेपासून पक्ष संघटने पर्यंत शिंदे गटाकडे बहुमत असल्याचे मान्य केले. दोन्ही गटाने त्यांचे दावे आणि कागदपत्रे आयोगासमोर सादर केली. त्याची पुष्टी झाल्याने आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्ष चिन्ह शिंदे गटाला दिले.

खरी शिवसेना कुणाची ?

खरी शिवसेना कुणाची ? हे ओळखण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदे गट समोरासमोर आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाची विचारधारा आम्ही पुढे नेत असून शिवसेना पक्ष आमचा असल्याचा दावा केला. तर उद्धव ठाकरे गट शिवसेनेवर आपला दावा कायम असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणी अनेक महिन्यापासून सुनावणी झाली नव्हती. येत्या २० नोव्हेंबरला सुनावणी होणार असून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह ठाकरेंचे का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Updated : 22 Oct 2023 9:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top