Home > Max Political > संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव?

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव?

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव?
X

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी दबाव? पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा संजय राठोड यांनी मंत्रिमंडळात प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावे यासाठी पोहरादेवी येथे महंताची नुकतीच बैठक घेण्यात आली. "आमदार संजय राठोड यांच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे सिद्ध झालेले नाही. मात्र जे नेते तुरुंगात आहेत, ते अजूनही मंत्रीपदी कायम आहे, त्यामुळे बंजारा समाजात नाराजी आहे" अशी भूमिका या बैठकीत मांडली गेल्याचे जितेंद्र महाराज यांनी म्हटले आहे.

मात्र अशाप्रकारची मागणी झाल्याची माहिती आपल्याला सोशल मीडियाद्वारे मिळाली, योग्य वेळ आल्यावर आपल्याला मंत्रिपद मिळेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपला योग्य संवाद आहे, त्यामुळे 23 एप्रिल रोजी बंजारा समाजाने आंदोलन करू नये असे आवाहन आमदार संजय राठोड यांनी केले आहे.


Updated : 18 April 2022 12:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top