Home > Max Political > शिवतारेंच्या राजकीय भूमिकेवर शिरसाठांची प्रतिक्रया...! काय म्हणाले संजय शिरसाट

शिवतारेंच्या राजकीय भूमिकेवर शिरसाठांची प्रतिक्रया...! काय म्हणाले संजय शिरसाट

शिवतारेंच्या राजकीय भूमिकेवर शिरसाठांची प्रतिक्रया...! काय म्हणाले संजय शिरसाट
X

शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती असताना बारामती लोकसभा मतदारसंघात वेगळं चित्र पहायला मिळत आहे. शिवतारे वारंवार निवडणूकीत उतरण्याविषयी व्यक्त होताना दिसत आहेत, पण त्यांच्या या भुमिकेवर महायुतीमधूनच आक्षेप घेण्यात येत आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाचे नेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यावरही शिरसाटांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

आमच्या आघाडीला आम्ही महायुती म्हणतो, तर युतीच्या कुठल्याही नेत्यांकडे पक्षाकडे गेले तर बंडखोरी करणं गरजेचं नाही आणि करू सुध्दा नये. महायुतीमध्ये एखाद्या पक्षाला जागा दिली तर तिथे बंडखोरी नको, ही भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं शिरसाट यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, शिरसाट म्हणाले की, विजय शिवतारे यांच्यासोबत दोन वेळा चर्चा झाली. त्यांना समजून सांगितलं. मात्र त्यांना हा निर्णय घ्यायचाच आहे तर पक्षाचा आणि त्यांचा संबंध राहणार नाही. आणखीही वेळ गेलेली नाही. आज उद्या चर्चा करून त्यांनी ऐकलं तर ते युतीसाठी चांगलं राहील. कारण अखेरचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना द्यायचा आहे. शिवतारेंना निवडणूक लढवायची असं त्यांचं ठाम मत असेल तर, आम्ही त्यांच्याबरोबर नाही, असं शिरसाट म्हणाले.

Updated : 23 March 2024 9:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top