Home > Max Political > शिंदे गटाच्या खासदारांना ठाकरे गटात पुन्हा संधी मिळेल? संजय राऊत म्हणाले...

शिंदे गटाच्या खासदारांना ठाकरे गटात पुन्हा संधी मिळेल? संजय राऊत म्हणाले...

शिंदे गटाच्या खासदारांना ठाकरे गटात पुन्हा संधी मिळेल? संजय राऊत म्हणाले...
X

महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून खडाजंगी सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे नाराज झाले असून, ते सध्या ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. परंतु ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यावर कठोर शब्दात म्हणाले की, जे उध्दव ठाकरेंना सोडून गेले आहेत अशा गद्दारांसाठी आता आमचे दरवाजे बंद झाले आहेत. अशा गद्दारांसाठी आमचे दरवाजे उघडले तर आमच्याशी एकनिष्ट असणाऱ्या निष्ठावंतांचा अवमान होईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

मागच्या निवडणुकीत शिवसेनेकडून आम्ही हेमंत गोडसेंना निवडून आणलं होतं पण ते आम्हाला सोडून शिंदे गटात गेले. आता कोणत्याही गद्दारासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. तुम्ही आमचा दरवाजा ठोठावला, अंगणात बसलात किंवा ऊर बडवलात तरी सुध्दा आम्ही आमचे दरवाजे आता उघडणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत म्हणाले की, जर आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडले तर आमच्या निष्ठावंतांचा अवमान होईल. अनेक निष्ठावान, प्रामाणिक, स्वाभिमानी जनता व स्वाभिमानी शिवसैनिक मिळून आम्ही उध्दव ठाकरे यांच्या नेत्वृत्वात एकजुट झालो आहोत. त्यामुळे गद्दारांना दरवाजे उघडले तर या सर्व निष्ठावंतांचा अवमान होईल, असे संजय राऊत मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Updated : 2 April 2024 1:08 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top