Home > Max Political > शरद पवार यांनी भाकरी फिरवली, महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे

शरद पवार यांनी भाकरी फिरवली, महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे

शरद पवार यांनी भाकरी फिरवली, महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसे
X

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असं चित्र उभ राहिल आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधील महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये भाकरी फिरवली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्याऐवजी तरुण नेतृत्वाकडे महिला प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं आहे. आक्रमक भूमिका घेणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांच्याकडे महिला प्रदेशाचे जबाबदारी स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.

भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हातात घेणारे एकनाथ खडसे यांच्यावर शरद पवारांनी विधान परिषद आमदारकी दिल्यानंतर आता खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे ( खेवलकर ) यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभा आणि लोकसभा डोळ्या समोर ठेवून शरद पवार यांनी हा निर्णय घेतल्याच राजकीय वर्तुळात असं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपच्या खासदार आहेत. रक्षा खडसे यांनी 2014 आणि 2019 या लोकसभेत मोठ्या विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी आल्यानंतर येणाऱ्या लोकसभेत रक्षा खडसे ह्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील अशी चर्चा सुरू आहे. तसंच खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत यामुळे एकनाथ खडसेंच्या एकाच घरात स्वतः एकनाथ खडसे विधान परिषद आमदार, सून रक्षा खडसे या खासदार, आणि आता कन्या रोहिणी खडसे आमदारकीसाठी प्रयत्न करणार आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करण्यात विरोधकांना आयती संधी मिळणार आहे.

कोण आहेत रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या असून त्या उच्च शिक्षित आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली असुन त्यांचें पदव्युत्तर शिक्षण वकिली क्षेत्रात मुंबई विद्यापीठातून एल एल बी, तर पुणे विद्यापीठातून एल. एल. एम पर्यंत झालेले आहे.

2014 विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी एकनाथ खडसे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक शिक्षण व विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण केला आहे

मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा असून त्यांनी एकनाथ खडसे यांनी स्थापना केलेली परंतु काही कारणाने अपूर्णावस्थेत असलेली सूतगिरणी सुरू करून स्थानिक महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या रोहिणी खडसे उपाध्यक्ष आहेत.

मुक्ताईनगर परिसरातील प्रमुख शैक्षणिक संस्था असलेल्या मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी मुक्ताईनगरच्या अध्यक्षा आहेत. यासंस्थेंतर्गत बालवाडी ते पदव्युत्तर शिक्षणाची सोय आहे. जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेच्या

रोहिणी खडसे कार्याध्यक्ष आहेत.

अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबईच्या नियामक मंडळाच्या माजी सदस्या असून अखिल भारतीय नाट्य परिषद

शाखा जळगावच्या रोहिणी खडसे अध्यक्षा म्हणुन काम पाहत आहेत.

मुक्ताईनगर परीसरात सामजिक, धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.

भारतीय जनता पक्षात असताना त्यांनी जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली आहे.

मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी जनसंवाद यात्रा काढली होती. यात्रेदरम्यान त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातील 182 गाव वस्त्या पाड्यांवर जाऊन तेथील ग्रामस्थांच्या समस्या जाणुन घेतल्या व त्या सोडविण्याचा प्रयत्न केला शिवाय पक्षाची सदस्य नोंदणी केली.

कापुस, केळी कांदा व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी काढलेला जनआक्रोश मोर्चा लक्षवेधी ठरला होता. याशिवाय पक्षाचे विविध आंदोलने उपक्रमामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग असतो.

त्यांचे पक्ष कार्य आणि संघटन कौशल्य बघुन पक्षाने त्यांना महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

Updated : 30 Aug 2023 1:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top