Home > Max Political > शरद पवार हे पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे उभे राहतात- रोहित पवार

शरद पवार हे पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे उभे राहतात- रोहित पवार

11 तासाच्या चौकशीत सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडीच्या) अधिकाऱ्यांना सहकार्य केल्यानंतर राष्ट्रवादी भवनाबाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले, ही लढाई अजून संपलेली नसून अशीच सुरू राहणार आहे. ईडीकडून झालेल्या 11 चौकशीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी कार्यकर्यांशी संवाद साधत, तुम्ही माझ्यासाठी, माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर इथे तब्बल 12 तास थांबलात त्याबद्दल मी आभारी आहे असं रोहित पवार म्हणाले.

शरद पवार हे पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे उभे राहतात- रोहित पवार
X


काल झालेल्या 11 तासाच्या चौकशीत सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडीच्या) अधिकाऱ्यांना सहकार्य केल्यानंतर राष्ट्रवादी भवनाबाहेर उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधत ते म्हणाले, ही लढाई अजून संपलेली नसून अशीच सुरू राहणार आहे. ईडीकडून झालेल्या 11 चौकशीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला यावेळी रोहित पवार कार्यकर्यांशी संवाद साधत म्हणाले की, तुम्ही माझ्यासाठी, माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर इथे तब्बल 12 तास थांबलात त्याबद्दल मी आभारी आहे.

रोहित पवार पढे असंही म्हणाले की, अनेक जन अशा परीस्थितीत थकतात, घाबरतात, आणि खचून जातात पण तुमच्या सहकार्याने मला जराही थकवा जाणवला नाही तसेच माझ्या पाठीशी एक 84 वयाचा खंबीर युवा उभा आहे असं म्हणत शरद पवार हे पळणाऱ्यांच्या मागे नाही तर लढणाऱ्यांच्या मागे उभे राहतात असंही वक्तव्य त्यांनी केलं.

चौकशी पुन्हा एकदा होणार

ईडीच्या 11 तासांच्या चौकशीनंतर रोहित पवारांना पुन्हा 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. या चौकशीसाठी ईडीकडून अतिरिक्तम माहिती मागवण्यात आली असून ही अतिरिक्त माहिती दिली जाणार आहे, असं ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Updated : 25 Jan 2024 6:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top