Home > Max Political > शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, शरद पवार यांची प्रतिक्रीया

शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, शरद पवार यांची प्रतिक्रीया

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. त्याचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. तर या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे.

शरद पवार यांच्या घरावर ST कर्मचाऱ्यांचा हल्लाबोल, शरद पवार यांची प्रतिक्रीया
X

पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर होते. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर संप मिटण्याची शक्यता असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार (Sharad pawar) यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानावर हल्लाबोल केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या घरावर चपला फेकल्या. त्यामुळे या घटनेचे राज्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान शरद पवार यांनी या घटनेवर प्रतिक्रीया दिली आहे. (ST Worker Attack on Sharad pawar home)

शरद पवार म्हणाले की, मी एसटी कामगारांच्या पाठीशी आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या नाही. तसेच जर एसटी कामगारांना कोणी चुकीचा रस्ता दाखवत असेल तर त्यांना योग्य रस्ता दाखवणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.याबरोबरच एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सर्वजण तातडीने दाखल झाले. त्यामुळे संकटकाळी सर्वजण एक आहोत हे आपण दाखवून दिले, त्याबद्दल शरद पवार यांनी आभार मानले. (Sharad pawar)

तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आज जे काही घडलं त्यासंबंधी आश्चर्य व्यक्त करण्याचे काही कारण नाही. कारण नेता चांगला नसला की त्याचा कार्यकर्तायांवरही मोठा दुष्परिणाम होतो. त्याचं उदाहरण आज पहायला मिळाले. तसेच राजकारणात विरोध असतो, टिका केली जाते. पण टोकाची भुमिका घेणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असे मत व्यक्त केले.

Updated : 8 April 2022 3:28 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top