Home > Max Political > पालखीतून गड गाठत शरद पवारांनी फुंकली रायगडावरून तुतारी

पालखीतून गड गाठत शरद पवारांनी फुंकली रायगडावरून तुतारी

पालखीतून गड गाठत शरद पवारांनी फुंकली रायगडावरून तुतारी
X

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी शनिवारी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या आपल्या नव्या निवडणूक चिन्हाचे अनावरण केले. यावेळी माजी मंत्री राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार अमोल कोल्हे, यांच्यासह सर्वच महत्वाचे नेते होते. या कार्यक्रमासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार हे पालखीतून रायगडावर पोहोचले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराची सुरूवात म्हणून या कार्यक्रमाकडे बघितले जात आहे. या माध्यमातून लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला शरद पवार गट सुरूवात करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पक्षातील प्रमुख इतर सर्वच नेते होते.

Updated : 24 Feb 2024 6:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top