Home > Max Political > खा. हेमंत पाटीलवरील अँट्राँसिटी गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा

खा. हेमंत पाटीलवरील अँट्राँसिटी गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा

शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यावर राज्याभरातून झालल्या टिकेनंतर नादेंड मधे, खा. हेमंत पाटील यांच्या मतदार संघात समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता.

खा. हेमंत पाटीलवरील अँट्राँसिटी गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा
X

खा. हेमंत पाटीलवरील अँट्राँसिटी गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चासामाजिक भावनेतून खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन डीनला जाब विचारला होता. परंतु डीन ने स्वतःच्या हातानीच पाणी ओतून झाडूनी स्वच्छता मोहीम राबवली होती. कालांतराने याचा बाऊ करून पाटील यांच्यावर अँट्राँसिटी चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा राजकीय सूड बुध्दीतून दाखल करण्यात आलेला आहे. याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयाल समोर खा. पाटील यांच्या समर्थकांनी आम्ही मोर्चा काढला आहे. दरम्यान आम्ही अँट्राँसिटीचे समर्थक आहोत, शेवट पर्यंत समर्थक राहु, मरेपर्यंत अँट्राँसिटी चा दुरूपयोग होत असेल अँट्राँसिटीच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला बदनाम करावयाचे असेल तर आम्ही याचे कट्टर विरोधक असल्याचं आंदोलकांनी म्हंटलं आहे.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील चाळीस पेक्षा अधिक रूग्णाचे मृत्यू झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील हे मृत्यूचे तांडव आजही थांबलेले नाही. दिवसेंदिवस रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. रुग्णालयातील अधिष्ठाता डॉक्टर वाकडे यांच्या ढिसाळ कारभाराविरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे ज्या वार्डात रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यांची चौकशी करून अधिष्ठाता प्रमाणेच संबंधित वॉर्डातील विभाग प्रमुख यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि उपचारासाठी आलेल्या निष्पाप रुग्णांच्या नातेवाईकांना न्याय मिळाला पाहिजे. यासह विविध मागण्यांसाठी आज शहरातील तिरंगा चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चात मृत्यू पावलेल्या रूग्णाचे नातेवाईक सुध्दा उपस्थित होते.



Updated : 11 Oct 2023 10:43 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top