Home > Max Political > स्वतः निवडून येण्याची शक्यता नसलेले दुसऱ्यांना ऑफर देत आहेत, संजय शिरसाट यांचा विनायक राऊत यांना टोला

स्वतः निवडून येण्याची शक्यता नसलेले दुसऱ्यांना ऑफर देत आहेत, संजय शिरसाट यांचा विनायक राऊत यांना टोला

स्वतः निवडून येण्याची शक्यता नसलेले दुसऱ्यांना ऑफर देत आहेत, संजय शिरसाट यांचा विनायक राऊत यांना टोला
X

नितीन गडकरी यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होत आहे. भाजपचे लोक नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्याचे डाव टाकत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले होते. त्यावरून संजय शिरसाठ यांनी टोला लगावला आहे.

नितीन गडकरी यांच्या खात्यात भ्रष्टाचार झाल्याची आवई उठवण्यात येत आहे. यामागे भाजपचं कुटीर कारस्थान आहे. भाजपचे लोकच नितीन गडकरी यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीसोबत यावं, असं आवाहन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रीया देतांना संजय शिरसाठ म्हणाले, जे लोक स्वतः निवडून येतील की नाही, याची ज्यांना गॅरंटी नाही, असे लोक नितीन गडकरी यांना पंतप्रधान पदाची ऑफर देत आहेत. त्यामुळे त्यांनी आपण स्वतः निवडून येतो की नाही ते आधी पहावं, असा टोला संजय शिरसाठ यांनी विनायक राऊत यांना लगावला.

Updated : 22 Aug 2023 2:50 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top