Home > Max Political > राज्यातही दंगली भडकवण्याचा होता डाव, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

राज्यातही दंगली भडकवण्याचा होता डाव, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

राज्यातही दंगली भडकवण्याचा होता डाव, संजय राऊत यांचा गंभीर आरोप
X

दिल्लीसह देशात (Delhi Riots) अनेक राज्यात हनुमान जंयतीनिमीत्त दोन समुह आमने सामने आले. त्यामुळे त्यातून दंगल सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावरून राज्यातही दंगली भडकवण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

दिल्लीतील जहांगिरपुर भागात हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या मिरवणूकीच्या वेळी हिंसाचार घडून आला. त्यामुळे या हिंसाचारानंतर पोलिसांनी 14 जणांना अटक केली. मात्र हनुमान जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातही अशा प्रकारे दंगल घडवण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Hanuman jayanti Riot Delhi)

राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणूकीत अशा प्रकारे दंगली धार्मिक तणावाचे वातावरण यापुर्वी कधीही नव्हते. मात्र सध्या राजकीय फायद्यासाठी दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण केली जात आहे. त्यातच दिल्ली येथे हनुमान जयंतीच्या मिरवणूकीवर दगडफेक झाली असली तरी या हल्ल्यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay raut criticize to BJP on Delhi Riots) राज्यातही हनुमान जयंतीच्या मिरवणूकीदरम्यान अशा प्रकारे हल्ले करण्याचे षडयंत्र केले जात होते. मात्र महाराष्ट्र पोलिसांनी हे षडयंत्र उधळून लावल्याचे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांची पंतप्रधानांवर टीका

संजय राऊत पुढे म्हणाले की, देशातील 10 पेक्षा जास्त राज्यात हनुमान जयंतीच्या दिवशी हिंसाचार झाला. तसेच राजधानी दिल्लीतही हनुमान जयंतीच्या मिरवणूकीवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे देशाचे पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांसमोर येऊन देशातील जनतेला शांततेसाठी आणि एकात्मकतेसाठी आवाहन करण्याची गरज आहे. मात्र पंतप्रधानांनी या घटनांवरही बाळगलेले मौन धक्कादायक असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. (Sanjay raut Criticize to PM Modi)

Updated : 17 April 2022 7:15 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top