Home > Max Political > आम्हालाही कार्यक्रम करता येतो, संजय राऊत यांचा अमित शहा यांना इशारा

आम्हालाही कार्यक्रम करता येतो, संजय राऊत यांचा अमित शहा यांना इशारा

आम्हालाही कार्यक्रम करता येतो, संजय राऊत यांचा अमित शहा यांना इशारा
X

पिंपरी-चिंचवड शहरात आज (7 जुलै) खासदार संजय राऊत Sanjay Rauat press conference यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकी शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आगामी महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत शिवसेना कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना संजय राऊत यांनी केल्या.

यावेळी संजय राऊत यांनी केंद्रात नवीन सहकार खातं तयार केल्यानं राज्याच्या अधिकारावर केंद्र आक्रमण करतंय का या सवालावर उत्तर दिलं. ते म्हणाले

राज्यातील सरकार व सहकाराला त्रास देण्यासाठी, त्यांची कोंडी करण्याकरिता जर केंद्र सरकारने सहकार खाते निर्माण केले असेल तर तो परत एक सत्तेचा गैरवापर आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम केला असेल तर आम्हाला देखील कार्यक्रम करता येतो. असं म्हणत अमित शहा यांना संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. (Sanjay raut warns amit shah on Cooperative ministry)

आगामी महानगरपालिकेची तयारी करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची संजय राऊत यांनी आज बैठक घेतली. यावेळी आगामी महानगर पालिकेत शिवसेनेचा महापौर बसवायचा. या करिता शिवसेनेचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहे. भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, पिंपरी चिंचवड मागील पाच वर्षात झालेले नाही. हाच मुद्दा घेऊन भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड असा नारा देत शिवसेनाही महानगरपालिकेची निवडणूक लढविणार आणि आम्ही दाखवून देऊ महापालिका कशी चालवायची,शहर कसे सांभाळायचे. (Sanjay raut on pimpari chinchwad Corporation Election)

असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कडून भाजप मध्ये गेलेले नगरसेवकच परत राष्ट्रवादीमध्ये येतील. तसेच शिवसेनेचे नगरसेवक जास्तीत जास्त शहरात निवडून येतील व भाजप यावेळी महानगर पालिका काबीज करू शकणार नाही. व सतत पक्ष बदलणारे हे स्वतःसाठी पक्ष बदलत असतात.

राष्ट्रवादीबरोबर आगामी महानगर पालिकेत आघाडी करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितले की, सन्मानजनक जागा मिळाली तर आम्ही राष्ट्रवादीशी आघाडी करू, नाहीतर आम्ही आमचे नगरसेवक स्वतंत्ररित्या लढविण्यास तयार आहोत. आम्ही असं म्हणतच नाही की, राष्ट्रवादीशी आघाडी करणार नाही. शेवटी राज्यात महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोतच. (Sanjay raut on pimpari chinchwad Corporation Election alliance with NCP)


Updated : 9 July 2021 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top