Home > Max Political > नवणीत राणा यांचे दाऊद कनेक्शन? संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट

नवणीत राणा यांचे दाऊद कनेक्शन? संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट

राज्यात सुरू असलेला हनुमान चालीसा वाद दाऊद गँगशी संबंध असल्याच्या आरोपापर्यंत पोहचला आहे.

नवणीत राणा यांचे दाऊद कनेक्शन? संजय राऊत यांचा नवा गौप्यस्फोट
X

राज्यात शिवसेना विरुध्द राणा दांपत्य हा वाद रंगला आहे. हा वाद राणा दांपत्याच्या अटकेनंतरही सुरूच आहे. त्यातच राणा दांपत्याचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. (Sanjay raut Tweet)

संजय राऊत यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, नवणीत राणा यांनी युसुफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. तर त्या युसुफ लकडावालाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. त्याला मनी लाँडरींग प्रकरणी ED ने अटक केली होती. कारण त्याचे दाऊद गँगशी संबंध होते. त्यामुळे राणांवर ED कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करत हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. (Navneet rana latest News)

संजय राऊत यांनी ट्वीट करून युसूफ लकडावालाचा उल्लेख केला आहे. तर त्याचा कोठडीत मृत्यू झाला होता. त्याबरोबरच युसूफ लकडावाला (Yusuf Lakadawala) याला ईडीने मनी लाँडरींग प्रकरणात अटक केली होती. त्याचाच संदर्भ संजय राऊत यांनी आपल्या गौप्यस्फोटात दिला आहे. तर संजय राऊत यांनी हे प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधीत असल्याचे सांगत खासदार नवणीत राणा यांच्यावर ईडी कारवाई करणार का? असा सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलेला फोटो या प्रकरणातील पुरावा असल्याचा दावा केला आहे. तसेच आणखीही काही धमाके करणार असल्याचा इशारा राऊत यांनी आणखी एका ट्वीटमधून दिला आहे.

संजय राऊत यांचे दुसरे ट्वीट

संजय राऊत यांनी पहिल्या ट्वीटमध्ये खासदार नवणीत राणा यांचे डी गँगशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राऊत यांनी तोच फोटो पुन्हा ट्वीट करत रात अभी बाकी है| बात अभी बाकी है| जय महाराष्ट्र असे ट्वीट करत आणखी धमाके करणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान खासदार नवणीत राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्याचा खुलासा करणारे ट्वीट मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केले आहे. तर राणा दांपत्याला 29 एप्रिल पर्यंत तुरूंगातच रहावे लागणार असल्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला.

Updated : 27 April 2022 3:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top