Home > News Update > संजय राऊत यांनी केलं अजित पवार यांचं कौतूक

संजय राऊत यांनी केलं अजित पवार यांचं कौतूक

संजय राऊत यांनी केलं अजित पवार यांचं कौतूक
X

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. त्यातच अजित पवार यांनी अमित शहा यांची भेट घेतली. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी अजित पवार यांचे कौतूक केले आहे.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर संजय राऊत यांनी टीका केली होती. मात्र त्यानंतर आता संजय राऊत यांनी अजित पवार यांचे कौतूक केले आहे.

अजित पवार यांना अर्थमंत्री पद सांभाळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. ते राज्यातील जनतेला आणि पक्षातील आमदारांना जास्तीत जास्त निधी देऊन गब्बर करत असतात, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

राज्यातील स्वाभिमानी नेते दिल्लीला जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान वैगेरे कचऱ्याच्या डब्यात टाकली आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Updated : 13 July 2023 7:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top