Home > Max Political > "सदाभाऊ खोतांचा न्यू बिजनेस" सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा

"सदाभाऊ खोतांचा न्यू बिजनेस" सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा

राज्यसभेपाठोपाठ राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. तर यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या दिवशी ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा धुराळा उडाला आहे.

सदाभाऊ खोतांचा न्यू बिजनेस सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा
X

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत दहा जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याविषयी सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.

सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषद निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर योगेश सावंत या ट्वीटर अकाऊंटवरून एका डंपरचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. तर त्याला सदाभाऊंची उमेदवारी असं कॅप्शन देण्यात आलं आहे. कारण त्या डंपरवर मिळाली होती पण नशिबात नव्हती असे वाक्य लिहीले आहे.

योगेश सावंत यांनी केलेल्या ट्वीटला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही गुड सेन्स ऑफ ह्युमर असं म्हटलं आहे.

महादेव पोळ यांनी योगेश सावंत यांच्या ट्वीटला रिप्लाय देतांना म्हटले आहे की, आता कायमचा उपाशी

@vntb89 या ट्वीटर अकाऊटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, एक जोक. ज्यामध्ये 13 जून हा सोन्याचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच सदाभाऊ खोत यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.

पुढे @vntb89 यांनी आणखी एक फोटो ट्वीट करून सदाभाऊ खोत वडे तळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये खोतांचा न्यू बिजनेस असे लिहीले आहे.

@kundanAvhad19 या ट्वीटर अकाऊंटरवर सदाभाऊ खोत राईट नाऊ असं शीर्षक देत फोटो ट्वीट केला आहे.

हबीब वासू बीओटी या ट्वीटर अकाऊंटवरून एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे.

प्रविण पाटील या ट्वीटर अकाऊंटवरून कार्टुन कॅरॅक्टर वापरत तुम्ही तुर्तास मागे घ्या. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करू असं देवेंद्र फडणवीस म्हणत असल्याचे मीम्स तयार केले आहे.

अनुज एकनाथ गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत गळाभेट घेत असल्याचा फोटो ट्वीट करत सदाभाऊ खोत यांना राजकीय निवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

राज नावाच्या अकाऊंटवरूनही सदाभाऊ खोत यांचे मीम्स व्हायरल केले आहेत.

Updated : 14 Jun 2022 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top