Home > Max Political > भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दुखःद निधन

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दुखःद निधन

वाशिमच्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं दिर्घ आजाराने निधन झाले आहे.

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दुखःद निधन
X

वाशिम जिल्हातल्या कारंजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचं दिर्घ आजारामुळे निधन झालं आहे. ते गेल्या दोन - तीन वर्षांपासून आजारी असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबईमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटणी यांच्या निधनानंतर त्यांना श्रध्दांजली अर्पण करत शोक व्यक्त केला आहे.

देवेंद्र फडणवीस आपल्या एक्स अकाउंटवरून ट्विट करत म्हणाले की, 'ही अत्यंत दुःखद बातमी आहे विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली." या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत.

Updated : 23 Feb 2024 11:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top