Home > Max Political > सगळ्यांचा DNA एक आहे तर CAA, NRC रद्द करा - अबू आझमी

सगळ्यांचा DNA एक आहे तर CAA, NRC रद्द करा - अबू आझमी

सगळ्यांचा DNA एक आहे तर CAA, NRC रद्द करा - अबू आझमी
X

भारतात हिंदू-मुस्लिम कुणीही असले तरी भारतीय म्हणून त्यांचा डीएनए एकच आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. यावर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी भागवत यांना टोला लगावला आहे. भागवत यांच्या वक्तव्याचे आपण स्वागत करतो, पण आता त्यांनी CAA, NRC सारखे कायदे रद्द करुन दाखवावे, असा आव्हानही आझमी यांनी दिले आहे. मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांच्याशी बातचीत करताना अबू आझमी यांनी ही भूमिका मांडली आहे.

पोलिसांना पैसे देणार पण ईद साजरी करणार- आझमी

तर दुसरीकडे अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्यही केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सण आणि उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आणले आहेत. त्याचप्रमाणे बकरी ईदसाठीही सरकारने काही निर्बंध लागू केले आहेत. पण या निर्बंधांना मुस्लिम आमदारांनी विरोध केला आहे. एवढेच नाही तर कोणत्याही परिस्थितीत बकरी ईद साजरी करणार, त्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागले तरी चालेल, असे वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे.

Updated : 5 July 2021 3:50 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top