संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी करण्याची मागणी
X
संभाजी भिडे यांनी एकदा एक वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता पुन्हा वाद सुरू झाला आहे. शिरूर तालुक्यातील मांडणगाव फराटा येथे त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. यानंतर संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी करण्याची मागणी आरपीआयच्या सचिन खरात यांनी केली आहे. "यापूर्वी याच जवळच्या भीमा कोरेगाव येथे दंगल झाली होती, पुन्हा याच भागात येऊन वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. या भागातील जनता गुण्या गोविंदाने राहत असताना बेजबाबदार आणि तोंडाळ संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे, या विधाणनामुळे सामाजिक ऐक्य बिघडू शकते म्हणून संभाजी भिडे यांना पुणे जिल्हाबंदी करावी" अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
संभाजी भिडे यांचे वक्तव्य काय?
छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास सुरू असल्याने संभाजी भिडे धारकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात होते. यावेळी वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर संभाजी भिडे मांडवगण फराटा आणि निर्वी येथे धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
"धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानात हिंदुस्थानच्या अस्तित्वाला दिलेले आव्हान दडले आहे. आज औरंगजेब नसला तरी पाकिस्तान, बांगलादेश आणि भारतातील मुस्लिमांच्या रुपाने तो शत्रू हिंदू समाजापुढे उभा आहे. देशासाठी आणि हिंदू धर्मासाठी ऐन तारुण्यात छत्रपती संभाजी महाराजांनी प्राण त्यागले पण धर्म सोडला नाही. संभाजी महाराज यांच्या हालअपेष्टांना इस्लाम धर्म, मुस्लिम समाज कारणीभूत आहे आणि तोच हिंदुस्थानचा खरा शत्रू आहे, आपणही सावध राहून त्यांना बलीदानाचा सूड घेण्याची जसेच्या तसे उत्तर देण्याची ताकद प्रत्येक हिंदू दाखवेल" असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.